शेतकऱ्यांनो, संघटित होऊन शेती करा

Shares

आंबिया बहाराची संत्री बरीच तोडून गेली,काहींना फायदा झाला तर जास्तीत जास्त या वर्षी तोटा झाला.
आता नवीन आंबिया बहराच्या नियोजनाची तयारी चालू झाली.
अशातच काही कंपनी वाल्यांनी सल्ला देण्याचे काम सुद्धा चालू केले आहेच.
काही शेतकरी सल्ला देत आहेत,तर काही शेतकरी ज्यांना पूर्ण नियोजन माहिती आहे त्यांनी आपल्या सोयी नुसार नियोजन चालू केले आहे.
आता चालू वर्षी चा अनुभव पाहता किती शेतकऱ्यांनी कमी खर्चाचे नियोजन केले,किंवा संत्रा उत्पादकांचा खर्च कसा कमी करता येईल यावर काही चिंतन मनन झाले की पारंपरिक पद्धतीनेच पुन्हा तेच नियोजन करायचे आणि संत्रा ला भाव नसला की चालू वर्षी सारखं कर्जबाजारी होवून हातावर हात देवून बसलं राहायचं.
शेतकरी बांधवांनी खर्च कसा कमी करता येईल यावर विचार करायला पाहिजे.
जर आपल्याला आपणच पिकविलेला शेतमाल स्वतः विकता येत नसेल तर किमान कमी खर्चात कसे उत्पादन घेऊ शकू याचा तरी विचार करायला पाहिजे….
मग अशा वेळी आपल्याला आपण करीत असलेल्या नियोजनात,आपल्या पद्धती त बदल करायला पाहिजे.
जे कमी खर्च करून भरघोस उत्पन्न घेतात अशा शेतकऱ्यांच्या मीटिंग घ्यायला पाहिजे,त्यांचे नियोजन समजून घ्यायला पाहिजे.
कोण्या कंपणीवले जर आले तर आपण लगेच त्यांचे प्रोडक्ट वापरतो, व ते सुध्दा आपल्याकडून लगेच पैसे घेवून मोकळे होतात,किंवा कृषि केंद्र वाले सुद्धा आपला मला शेतकऱ्याला विकून पैसे घेवून मोकळे होतात.
अडकतो फक्त आपणच शेतकरी.
मग जर आपल्याला नुकसान लागले तर याला जबाबदार फक्त आपणच ठरतो.
कोणतीही कंपनी किंवा कृषि केंद्र वाले ही जबाबदारी घेत नाहीत.
त्यांचा उद्देश फक्त पैसा कमविणे एवढंच .
मी बरेच वर्षापासून पाहतो की कोणत्याही कृषि केंद्र वाल्यांनी आपली जमीन विकून दुकानाचा घाटा भरला नाही,उलट त्यांच्या प्रॉपर्टी मध्ये कमालीची वाढ झाली आहे.
मात्र या उलट शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी विकल्या आहेत.
जर जमिनीत कमी खर्चात भरघोस उत्पन्न निघाले तर आपणही जमिनी विकत घेतल्या असत्या .
पण आता जमिनी विकत घेणारे शेतकरी बोटावर मोजण्या इतकेच आहेत…
बघा विचार करा,संघटित होवून शेती करा,कमी खर्चात कशी बाग उभी करता येईल याचा विचार करून नियोजन करा.
आपलाच एक संत्रा उत्पादक शेतकरी…..

राहुल साहेबराव उभाले
Rahul4patil1212@gmail.com

हे ही वाचा (Read This ) या फळाची लागवड करून मिळवा १०० % अनुदान.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *