या पिकाची लागवड करून मिळवा ३ लाख ३ महिन्यात, मिळणार ७५% सरकारी अनुदानही

Shares

सर्वांच्या अंगणात लावली जाणारी, अत्यंत गुणकारी, धार्मिक तुळस (Basil) लागवड करून तुम्ही मिळवू शकता भरगोस उत्पन्न आणि सरकार देणार यासाठी कर्ज तसेच अनुदान. भारतात (India) तुळशीला खूप महत्व असून अनेकांच्या अंगणामध्ये तुळस अगदी सहज पाहायला मिळते. तुळस ही अत्यंत गुणकारी आहे. कित्तेक आजारांवर तुळस फायदेशीर ठरते त्यामुळे तुळशीला औषधी वनस्पती म्हंटले जाते. तुळशीचा वापर अनेक औषधी तयार करण्यासाठी केला जातो त्यामुळे तुळशीला औषधी कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी केली जाते. त्यामुळे तुम्ही तुळशीची शेती करून अधिक उत्पन्न कमवू शकता. आता यासाठी सरकारकडून अनुदान देखील दिले जाणार आहे.

हे ही वाचा (Read This) कमी जागेत कमी गुंतवणूक करून मिळवा जास्त नफा.

१५ हजार रुपये गुंतवून मिळवा भरगोस उत्पन्न
तुम्हाला कमी गुंतवणूक करून अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर तुळशीची शेती करून तुम्ही लाखोंचे उत्पन्न मिळवू शकतात. तुम्हाला तुळशीची लागवड करायची असेल तर तुम्ही अगदी १५ हजार रुपये गुंतवून हा व्यवसाय सुरु करू शकता. तुळशीचे रोप ३ महिन्यातच तयार होतात तर हे पीक ३ लाखांमध्ये विकले जाणार आहे. कित्तेक आयुर्वेदिक (Ayurvedic) उत्पादन उत्पादकास मोठया संख्येनें तुळशीची गरज असते. त्यामुळे त्यास मागणी देखील जास्त असते. तुम्ही अगदी ३ महिन्यात १५ हजार रुपयांची गुंतवणूक करून लाखों रुपये कमवू शकता.

तुळस लागवडीसाठी मिळणार अनुदान
नॅशनल मेडिसिन्स प्लांट बोर्ड (NMPB) औषधी पीक लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना पीक लागवड तसेच पीक व्यवस्थापनासाठी अनुदान देते. याची संपूर्ण माहिती तुम्हाला NMPB च्या वेबसाइट वर मिळेल. केंद्रीय आयुष्य मंत्रालय (NAM) योजनेतील औषधी वनस्पतींचा भाग लागू करत आहे. शेतकऱ्यांना या कार्यक्रमांतर्गत १४० औषधी वनस्पतींच्या शेतीसाठी उतपादन खर्चाच्या ३०%, ५०%, ७५% अनुदान दिले जाते. NAM ने वर्ष २०१५ पासून २०२० पर्यंत ४८,०४० हेक्टर औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी निधी दिलेला आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *