या फळाची लागवड करून मिळवा १०० % अनुदान

Shares

शेतकरी ( Farmer) अधिक उत्पन्न मिळावे यासाठी विविध पिकांची लागवड करत असतो. त्यात फळबागेकडे शेतकरी जास्त आकर्षित होतांना दिसून येत आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक फळांची लागवड केली जाते. त्यात आता ड्रॅगन फ्रूटची भर पडली आहे. ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी ( Dragon Fruit Cultivation) शासनाने देखील आता परवानगी दिली असून ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. आता राज्यातील शेतकऱ्यांना ड्रॅगन फ्रुट ( Dragon Fruit ) लागवडीसाठी अनुदान दिले जाणार आहे. काय आणि किती अनुदान ( Subsidy) दिले जाणार आहे याची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.

ड्रॅगन फ्रुट लागवडीवर मिळणार अनुदान
ड्रॅगन फ्रुट आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहेच. ड्रॅगन फ्रुटमध्ये कॅल्शिअम , मिनरल्स, फॉस्फरस उपलब्ध असून ड्रॅगन फ्रुट अत्यंत गुणकारी आहे. त्यामुळे त्यास सुपर फ्रुट (Super Fruit) म्हणून देखील ओळखले जाते. ड्रॅगन फ्रुटचे पीक कमी पाण्यात देखील घेता येते. या फळामध्ये काही औषधी गुणधर्म दडलेले आहेत. या सर्व बाबी लक्षात घेता सरकारने २०२१-२२ वर्षांपासून राज्यामध्ये एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत ड्रॅगन फ्रुट अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

हे ही वाचा (Read This ) युरिया ऐवजी याची फवारणी करून मिळवा अधिक उत्पन्न

किती मिळेल अनुदान ?
लाभार्थ्यास लागवडीसाठी लागणारे साहित्य, ठिबक सिंचन, आधार पद्धत, खत व पीक संरक्षणासाठी अनुदान देय आहे. १ लाख ६० हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान दिले जाणार असून प्रथम ४ लाख रुपये प्रति हेक्टर प्रकल्पग्रस्थ ग्राह्य धरून ४० टक्के प्रमाणे अनुदान दिले जाणार आहे. हे अनुदान ३ टप्प्यामध्ये दिले जाणार असून पहिल्या वर्षी ६० % त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या वर्षी २० % प्रमाणे हे अनुदान दिले जाणार आहे. मात्र यासाठी दुसऱ्या वर्षी लागवडीच्या ७५ % तर तिसऱ्यावर्षी ९० % झाले जिवंत असणे गरजेचे आहे.

अनुदानासाठी काय आहे पात्रता ?
१. अर्जदाराकडे स्वमालकीची २० गुंठे जमीन असणे गरजेचे आहे.
२. ड्रॅगन फ्रूटची लागवड पुन्हा नव्याने करत असणाऱ्यास याचा लाभ घेता येईल.
३. या अनुदानासाठी तुम्ही निवड झाल्यास कागदपत्रांबरोबर तुमचे संमतीपत्र देणे आवश्यक आहे.

आवश्यक असणारी कागदपत्रे
१. पासपोर्ट आकाराचा फोटो
२. ७/१२ उतारा
३. ८ अ उतारा
४. बँक पासबुक झेरॉक्स ( आधार लिंक असणे गरजेचे )
५. आधार कार्ड
६. जातीचा दाखल ( अनुसूचित जाती , जमाती )
७. ७/१२ सामायीक असेल तर खातेदारांचे संमतीपत्र

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *