भारतीय शेतकरी अज्ञानी व गरीब आहे ! एकदा वाचाच

Shares

नमस्कार मंडळी आज काही वेगळं सांगायच आहे.शेती हा अत्यंत प्राचीन असा व्यवसाय आहे. भुतळावरचे दोन तृतीयांश लोकांना चा अजूनही शेती व्यवसायावर उदरनिर्वाह आहे. शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा समजला जातो असे अनेक देश जगाच्या पाठीवर आहेत. कृषी व्यवसाय हा उपलब्ध नैसर्गिक साधनसामुग्री आणि अत्यंत कमी भांडवलात करता येतो. त्यामुळे दारिद्रयरेषेखाली असलेल्या लोकांना सुध्दा तुटपुंज्या शेतीवर उदरनिर्वाह करता येतो. परंतू आता शेतीचे स्वरूप बदलले आहे. ती केवळ उदरनिर्वाहाचे साधन न राहता व्यावसायिक महत्व सुध्दा अधोरेखीत करते.

UP: शेतकऱ्यांना दिलासा,मिळणार नॅनो युरिया, ‘नॅनो युरिया कमी खर्चात ८% जास्त उत्पन्न

आधुनिक तंत्रज्ञानाने शेतीचे स्वरूप पालटले आहे. अन्नधान्यासाठी शेती केली जाते हा समज मागे टाकून तंत्रज्ञानाच्या साहायाने शेतीचे व्यावसायीक स्वरूप विकसीत झाले आहे. तांदूळ, गहू, बाजरी, मका, हरभरा, तूर अशा अन्नधन्याच्या उत्पादनाशिवाय कापूस, ताग, रबर, ऊस अशी व्यापारी पिके ही मोठया प्रमाणात घेतली जावू लागली आहेत.

भारतामध्येही ‘हरित क्रांती’ घडून आली आणि परंपरागत पध्दतीने होणारी भारतीय शेती कात टाकू लागली. भारतातील 70 टक्के लोकसंख्या कृषीवर अवलंबून आहे. भारतातील शेती हा अत्यंत महत्वपूर्ण व्यवसाय आहे. प्राचिन काळापासून भारतातील शेती अर्थसंस्थेचा महत्वाचा घटक राहीलेली आहे. भारताची लोकसंख्या मोठया प्रमाणात शेतीवर अवलंबून आहे त्यामुळे शेती योग्य जमीनीचे प्रमाण वाढतांना दिसते. लोकसंख्येचे वाढते प्रमाण लक्षात घेता तर भारतात दरडोई उत्पन्नाचो प्रमाण मात्र कमी आहे. भारतातील शेती अजूनही पारंपारीक पध्दतीने करण्यात येते त्यामुळे उत्पादन क्षमता कमी आहे. भारतातील शेताचा आकार लहान असून शेती साधारणतः पावसाच्या पाण्यावर आधारीत असते.

मोदी सरकारचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी एमएसपीवर समिती स्थापन

निसर्गाच्या लहरीपणाचा शेतीला मोठा फटका बसत असतो. प्रामुख्याने खरीप आणि रब्बी अशा दोन हंगामात शेतीचे उत्पादन घेतले जाते. पावसाचे पाणी साठवून, अडवून सिंचनाची सोय केली जाते. ज्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी असते त्या वर्षी कोरडा दुष्काळ पडतो आणि शेती व्यवसायाची दैनावस्था होते. तर एखाद्यावर्षी नको तितका पाऊस पडतो आणि ओला दुष्काळ पडतो. अशा वेळी सर्वस्वी शेतीवर अवलंबून असणाऱ्या ग्रामीण भागातील लोकांचे जिवन उध्वस्त होते. सिंचनाच्या सोईंच्या अभावी शेतीव्यवसाय नेहमी तोटयात चालतो. भारतात बहुतेक शेतकरी नांगरणी, पेरणी, कापणी, मळणी इ. कामे करण्यासाठी लाकूड व लोखंडापासून बनविलेली शेतीची औजारे वापरली जातात.

12वी नंतर करिअर: प्लांट पॅथॉलॉजी म्हणजे काय? हा कोर्स तुम्ही 12वी नंतर करू शकता, दरमहा 55 ते 65 हजार रुपये पगार मिळेल

नांगर, वखर बैलगाडी इत्यादी ओढण्यासाठी बैलाचा वापर केला जातो. शेणाचा वापर इंधनासाठी केला त्यामुळे शेणखत तयार करण्यासाठी कमी प्रमाणात वापर केला जातो. परिणामी हेक्टरी उत्पादन कमी होते आणि एकुण उत्पादनही कमी होते. शेणावर आधारीत गोबरगॅसचा वापर स्वयंपाकासाठी केला जातो तसेच शेणाच्या गोवऱ्या बनवून त्यांचा वापरसुध्दा इंधन म्हणून केला जातो.भारतातील मोठी लोकसंख्या शेती व्यवसायावर अवलंबून आहे. भारतीय शेतकरी अज्ञानी व गरीब आहे. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी शेती करणे आवश्यक समजले जाते. शेतीचा वापर उद्योग व्यवसायासाठी करण्यात यावा हे विचार अजूनही रूजलेले आढळत नाही. यंत्र सामुग्री अभावी उदयो व्यवसायात भरभराट होत नाही. त्यांच्याकडे जनावरे हाच एक मार्ग शेतीसाठी असतो.

ड्रोन खरेदीवर 100% सबसिडी

परंतू जनावरांना पौष्टीक अन्न देण्याची ऐपत त्यांच्यात नाही, त्यामुळे ही जनावरेही कृश असतात. त्यामुळे शेती व्यवसायात भरभराट होत नाही. शेतकरी सतत कर्जबाजारी असतो. घरातील आजारपण किंवा लग्नकार्य यासाठी तो बॅका व सावकाराकडून कर्ज घेतो. कर्ज फेडता येत नाही म्हणून आत्महत्याही करतो. भांडवलाअभावी आणि आधुनिक यंत्राअभावी भारतीचे शेतीचे उत्पादन कमी होते. उत्पादन कमी म्हणून आर्थिक परिस्थिती खालावलेली असते म्हणून तो कर्ज काढतो व कर्जाची परतफेड शेतीच्या उत्पादनातून करू असा विचार करतो, परंतु ते शक्य होत नाही. म्हणून भारतीय शेतीचा म्हणावा तेवढा विकास होतांना आढळत नाही.भारतातील हवामान हे भारतीय शेतीच्या नैसर्गिक समस्यांपैकी एक आहे. भारतातील तापमान व पर्जन्यमान यांचा शेतीवर परिणाम झालेला आढळतो. त्यामुळे शेतीचे उत्पादनही कमी जास्त होत असते. पावसाच्या लहरीपणाचा फटका शेतीला बसतो.

गायीची ही जात ५० ते ७० लिटर दूध देते – जाणून घ्या संपूर्ण माहिती

कमी पावसामुळे कधी धान्य पीकत नाही तर अधिक पाऊस पडून धान्य सडून वाया जाते. त्यामुळे नैसर्गिक आपत्तींना शेतकऱ्यांना सतत तोंड द्यावे लागते. पिकांना आवश्यक तेवढे पाणी पडले नाही तर पिके वाळून जातात. सिंचनाच्या सोईच्या अभावी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते. काश्मीरसारख्या राज्यात हिवाळयात तापमान गोठणबिंदूच्या खाली जात असल्यामुळे हिमवृष्टी होते व तेथील लोक हिवाळी पीक घेवू शकत नाही भारतातील बहुतांश जमीन वरच्या पावसावर अवलंबून असल्यामुळे वर्षातून एकच पिक घ्यावे लागते. कारण पाणीच नसेल तर पिकाची नासाडी होईल. हवामानाचा असा वाईट परिणाम भारतीय शेती व्यवसायावर होत असतो………

विचारांची दीशा बदला. जिवनाची दशा आपोआप बदलेल

मिलिंद जि गोदे

milindgode111@gmail.com

mission agriculture soil information

४ महिला आमदारांची आर्थिक फसवणूक ; पुण्यात गुन्हा दाखल
Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *