तूर खरेदीला केंद्राने दिला हमीभाव मात्र खरेदीची हमी नाही

Shares

नवीन वर्षाच्या अगदी पहिल्या दिवशीच १८६ तूर खरेदी केंद्र सुरु करण्यात आले होते. परंतु या तूर खरेदीसाठी काही अटी असल्यामुळे शेतकरी सुरवातीपासूनच थोडा गोंधळात होता. शासनाने तूर उत्पादकता ठरवून दिली असून त्यानुसारच तूर (Tur) खरेदी होत आहे. नुकत्याच झालेल्या वातावरण बदलामुळे ( Climate Change) तुरीच्या उत्पदकतेत घट करण्यात आली असून ठरवून दिलेल्या हमीभावाचा शेतकऱ्यांना फायद्यापेक्षा अडचण जास्त होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कारण शासनाने हमीभाव ठरवला, १८६ खरेदी केंद्रे उघडली मात्र शेतमाल विक्रीची हमी दिलेली नाही.

उत्पादकता निम्म्याने केली कमी…
उत्पादकतेच्या बाबतीत जिल्हा कृषी ( Agriculture) अधीक्षक कार्यालयाचा अहवाल महत्वाचा मानला जात असून त्यानुसार हेक्टरी उत्पादन किती होईल याच अंदाज बाळगला जातो. शासनाने ठरवलेल्या उत्पादकतेपेक्षा जास्त तूर शेतकऱ्यांना केंद्रावर विक्री करत येत नाही. यंदा शासनाने उत्पादकता निम्म्याने कमी केली असल्यामुळे तुरीचे अधिक उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांनी बाकी तुरीची विक्री कुठे करावी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

हे ही वाचा (Read This ) एका एकरात चक्क १५ लाखांचे उत्पन्न !

तूर उत्पादकतेवर नियम का लावला ?
शासनाने तूर खरेदी केंद्र सुरु केले असून त्याची उत्पादकता ठरवून दिली आहे. शासनाने उत्पादकता ठरवून देण्यामागील कारण असे की , व्यापारी अनेकदा शेतकऱ्यांकडून कमी दरात तूर खरेदी करून खरेदी केंद्रामध्ये अधिक भावात विकतो. यामुळे शेतकऱ्यांबरोबर शासनाचेही मोठ्या संख्येने नुकसान होत असल्यामुळे शासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांची जरी थोडी अडचण होत असेल तरी कारभारामध्ये तत्परता राहावी यासाठी हा नियम पाळला जावा असे शासनाने सांगितले आहे.

वर्ष २०२१-२२ करीता ठरवण्यात आलेली उत्पादकता
पुणे प्रति हेक्टरी ४.०० क्विंटल
अमरावती प्रति हेक्टरी १०.०० क्विंटल
कोल्हापूर प्रति हेक्टरी ७.०० क्विंटल
सातारा प्रति हेक्टरी ९.५० क्विंटल
सांगली प्रति हेक्टरी ६.२९ क्विंटल
अहमदनगर प्रति हेक्टरी ५.५० क्विंटल
जळगाव प्रति हेक्टरी ५.५० क्विंटल
नंदुरबार प्रति हेक्टरी ५.२९ क्विंटल
नाशिक प्रति हेक्टरी ३.८० क्विंटल
सिंधुदुर्ग प्रति हेक्टरी ४.०० क्विंटल
औरंगाबाद प्रति हेक्टरी ४.९० क्विंटल
जालना प्रति हेक्टरी १५. ०० क्विंटल
परभणी प्रति हेक्टरी 7.00 क्विंटल.
हिंगोली प्रति हेक्टरी 2.25 क्विंटल
नांदेड प्रति हेक्टरी 6.50 क्विंटल.
लातूर प्रति हेक्टरी 10.00 क्विंटल.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *