‘वाह रे पठ्ठया’ दीड एकरात घेतले ९० टन ढोबळी मिरचीचे उत्पादन

Shares

लॉकडाउन काळात कॉलेज बंद असल्यामुळे अनेक शेतकरी पुत्रांनी आपले पाय शेतीकडे वळवले होते. एवढेच काय तर त्यांनी त्यातून नफा देखील मिळवला आहे. अश्याच एका युवकाने घटनांद्रे येथे दीड एकर क्षेत्रात ८ ते ९ महिन्यात चक्क ९० टन ढोबळ्या मिरचीचे उत्पादन घेतले आहे.
शेतकरी वैभव शिंदेने तज्ञांची मदत घेऊन मातीच सोनं केलं आहे. आपण आज याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

हे ही वाचा (Read This ) एकदाच करा या पिकाची लागवड मिळेल १२ वर्ष उत्पन्न ते हे लाखात, सरकार करणार मदत

दीड एकरात ढोबळी मिरचीची लागवड करून घेतले ९० टन उत्पादन
शेतकरी वैभव शिंदे याने ८ महिन्यांपूर्वी इंडस – ११ या ढोबळी मिरचीच्या वाणाची लागवड केली होती. त्याने मागील वर्षी आलेल्या अडचणींचा अभ्यास करून यंदा लागवडीपूर्वीच सर्व तयारी केली होती. गेल्या वर्षी शेत पाण्याने भरले होते त्यामुळे त्याने होईल तेवढे सर्व उपाय पहिलेच केले.

हे ही वाचा (Read This ) शेतकऱ्यांसाठी महत्वाचे, जिप्समचा वापर केव्हा आणि कसा करावा, काय घ्यावी काळजी ?

लागवडीनंतर ४५ दिवसांनीच पहिला तोडा सुरु झाला होता. पहिले ८ तोडे हे दर ७ – ८ दिवसांनी येत होते. सुरुवातीला दराच्या तुलनेत उत्पादन अधिक झाले होते. मात्र नंतर उत्पादन कमी झाले असले तरी दरात वेगाने वाढ होत होती. सुरवातीला दर २०, ३०, ४० रुपये किलो मिळत होता त नंतर ६४ रुपये किलो दर मिळण्यास सुरुवात झाली. दराची सरासरी पहिली तर ३५ रुपये किलो प्रमाणे होती.

वेळोवेळी योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे मला ९० टन पर्यंतचे उत्पादन घेता आले, असे शिंदे त्यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा (Read This ) लाल मिरचीचा ठसका, भावात जोरदार तेजी

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *