एकदाच करा या पिकाची लागवड मिळेल १२ वर्ष उत्पन्न ते हे लाखात, सरकार करणार मदत

Shares

अनेक शेतकरी आता मुख्य पिकांऐवजी इतर पीक घेऊन शेती व्यवसायामध्ये विविध प्रयोग करत आहेत. त्यामध्ये फुलशेती कडे देखील शेतकऱ्यांचा चांगला कल दिसत आहे. अश्याच एका फुलशेतीची आपण आज माहिती जाणून घेणार आहोत.

तुम्ही जर फुलाची शेती करण्याचा विचार करत आहात तर लॅव्हेंडर फुलाची शेती करणे तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. लॅव्हेंडर फुलापासून तेल, लॅव्हेंडर पाणी, ड्राय फ्लॉवर यांसारखे अनेक बनवल्या जातात. तर प्रति वर्षी एक हेक्टर मध्ये याची शेती करून साधारणतः ४० ते ५० किलोग्रॅम पर्यंत तेल मिळत असून सध्या या तेलाची १० हजार रुपये प्रति किलो दर आहे.

हे ही वाचा (Read This ) शेतकऱ्यांसाठी महत्वाचे, जिप्समचा वापर केव्हा आणि कसा करावा, काय घ्यावी काळजी ?

लॅव्हेंडर शेतीबद्दल थोडी माहिती
लॅव्हेंडर ची तुम्ही एकदा लागवड केली तर १० ते १२ वर्षापर्यंत तुम्हाला त्यामधून नफा मिळवता येतो. हे पीक बाराही महिने घेता येत असून ओसाड जमिनीमध्ये देखील या पिकाची लागवड करता येते. तर इतर पिकांबरोबर देखील या पिकाची लागवड करता येते.

लॅव्हेंडरची शेती करणाऱ्यास पारंपरिक पिकांची शेती करणाऱ्यांच्या तुलनेत ५ ते ६ पट जास्त उत्पन्न मिळते. यासाठी सरकार देखील शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून काही उपाययोजना राबवत आहेत.
लैव्हेंडर लागवडीचे आकर्षक पैलू दाखवण्यासाठी डोडा, जम्मू आणि इतर जिल्ह्यांमध्ये आणि नंतर उर्वरित देशात जागरूकता कार्यक्रम आयोजित केले जावेत. तसेचअरोमा मिशन अंतर्गत स्टार्टअपला प्रोत्साहन दिले जावे यासाठी सरकार कार्य करत आहे. लॅव्हेंडर उत्पादनांसाठी आगाऊ आणि मागास श्रेणी सुधारण्यासाठी विविध उपक्रम घेतले जात आहेत आणि विविध विपणन पर्याय शोधले जात आहेत, ज्यासाठी विविध उद्योग भागीदारांसोबत चर्चा सुरु आहे.
जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ‘एक उत्पादन’ उपक्रमांतर्गत उत्पादनांच्या ब्रँडिंगवरही भर देण्यात आला. असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा (Read This ) शेताच्या बांधावर या झाडाची लागवड करून कमवा लाखों रुपये

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *