लाल मिरचीचा ठसका, भावात जोरदार तेजी

Shares

यंदा अतिवृष्टी, अवकाळी याचा परिणाम जवळ जवळ सर्वच पिकांवर झाला असून मिरचीच्या उत्पादनात घट होऊन अनेक मिरची पिकाचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्राबरोबर कर्नाटक येथील मिरचीचे देखील भरपूर नुकसान झाले आहे. त्यामुळे मध्य प्रदेश, आंध्रप्रदेश येथील आवक कमी झाली आहे. तर मिरचीचे भाव कडाडले आहेत.
मिरचीच्या अस्सल वाणाला धक्का लागून संकरित वाणांची आवक वाढतांना दिसत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा निम्म्याने आवक घटली आहे. पुढील २ महिन्यात मिरचीच्या दरात अधिक वाढ होण्याची शक्यता असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा (Read This ) शेतकऱ्यांसाठी महत्वाचे, जिप्समचा वापर केव्हा आणि कसा करावा, काय घ्यावी काळजी ?

मिरचीबरोबरच इतर मसाल्यांच्या दरात देखील दर वाढ होत असल्यामुळे आता गृहिणींना दरवाढीच्या ठसक्याला सामोरे जावे लागत आहे. मिरचीच्या असाल वाणांच्या भाववाढी मुळे संकरित वाणांची खरेदी जास्त प्रमाणात होत आहे.

कसे आहेत मिरचीचे दर ?
मिरचीच्या संकरित जातींची विक्री ३५० ते ६०० रुपये प्रतिकिलो प्रमाणे होत आहे. तर लाल मिरचीचे दर खालील प्रमाणे आहेत.

काश्मिरी रेशम पट्टा – ५०० ते ६५०
ब्याडगी (केडीएल) – ४५० ते ६००
ब्याडगी (डीडी) – ४०० ते ५५०
रुद्रा ब्याडगी – ३५० ते ४००
सिजेंटा ब्याडगी – ३५० ते ४००
हैदराबाद ब्याडगी – ३०० ते ५५०
तेजा/लवंगी – २८० ते ३००
देशी जवारी – २८० ते ३००
गुंटूर – १८० ते २५०
संकेश्‍वरी – ७५० ते १५००

हे ही वाचा (Read This ) एकदाच करा या पिकाची लागवड मिळेल १२ वर्ष उत्पन्न ते हे लाखात, सरकार करणार मदत

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *