PM-SYM : शेतकऱ्यांसाठीची काय आहे पेन्शन योजना, कसा करावा अर्ज?

Shares

केंद्रसरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असते. आता असंघटित क्षेत्रात कमी उत्पन्न मिळत असणाऱ्यांसाठी सरकारने प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना राबवली आहे. शेतकऱ्यांना पेन्शन देण्याच्या उद्धेशाने ही योजना राबवण्यात येत आहे. ज्यांचे मासिक उत्पन्न १५००० रुपयांपेक्षा कमी आहे तेच य या योजनेचा लाभ घेऊ शकतात. असंघटित क्षेत्रात काम करणारे १० कोटी लोक पुढील ५ वर्षे या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेसाठी सरकारने ५०० कोटी रुपयांची तरतुदी दिली आहे.
ही योजना ३६ राज्यात सुरु करण्यात आली असून आतापर्यंत ४६ लाखांपेक्षा अधिक लोकांनी या योजनेत सहभाग घेतला आहे. ३ लाखांपेक्षा अधिक संपर्क केंद्र देशभरात सुरु करण्यात आले आहे.

ही वाचा (Read This ) शेळीपालन आणि कुक्कुटपालन साठी मिळणार 50 लाख रुपये अनुदान

या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय आहेत अटी?

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे मासिक उत्पन्न हे १५ हजारपेक्षा कमी पाहिजे. या योजनेचा लाभ १८ ते ४० वर्ष वयोगटातील कोणतीही व्यक्ती घेऊ शकते. ज्यांनी ही पेन्शन योजना घेतली आहे त्यांना वयाच्या ६०व्या वर्षानंतर महिन्याला ३ हजार रुपये पेन्शन मिळते. पेन्शन दाराचा मृत्यू झाल्यास जोडीदारास ५० टक्के रक्कम मिळते.

हे ही वाचा (Read This ) शेतकरी मित्रांनो, SHCS या योजनेचा आपण लाभ घेतला आहे का ?

किती प्रीमियम भरावा लागेल?
या योजनेसाठी तुम्हाला प्रीमियम भरावा लागत असून वयोगटानुसार प्रीमियम भरावा लागणार आहे. दरमहा ५५ ते २०० रुपये योगदान दयावे लागणार आहे. जेवढी रकम तुम्ही या योजनेत गुंतवाल तेवढीच रकम केंद्र सरकारकडून यामध्ये भरली जाणार आहे.

ही वाचा (Read This ) महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना २०२२, मिळणार ५ हजार प्रतिमहा

नोंदणी कुठे व कशी करावी ?

यो योजनेसाठी तुम्हाला नोंदणी कार्याची असेल तर तुम्हाला जवळच्या सामान्य सेवा केंद शोधण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO)अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. IFSC कोड सोबत तुमचे आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. तुमचा सर्व तपशील कॉम्पुटरमध्ये टाकताच तुमच्या मासिक योगदानाची माहिती मिळेल. खाते उघडल्यानंतर तुम्हाला श्रम योगी कार्ड मिळेल. तुम्ही यासाठी LIC , ESIC , EPFO तसेच केंद्र आणि राज्यसरकारच्या कामगार कार्यालयात अर्ज सादर करू शकता.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *