शेतकरी मित्रांनो, SHCS या योजनेचा आपण लाभ घेतला आहे का ?

Shares

सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक उपाययोजना, कार्यक्रम राबवत असते. अशीच एक शेतकऱ्यांच्या हितासाठी २०१५ मध्ये मृदा स्वास्थ कार्ड स्कीम (Soil Health Card Scheme)) राबवण्यात आली होती. या योजनेअंतर्गत मातीचे परीक्षण करून मातीची गुणवत्ता कशी सुधारता येईल जेणेकरून पिकांची वाढ चांगली होऊन अधिक उत्पादन मिळावे यासाठी मार्गदर्शन केले जाते. मृदा स्वास्थ कार्ड स्कीम अंतर्गत एक हेल्थ कार्ड दिले जाईल. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीची माती कोणत्या प्रकारची (Soil Type) आहे तसेच मातीची गुणवत्ता काय आहे याची संपूर्ण माहिती दिली जाते. जेणेकरून जमीन ओळखून योग्य पिकाची लागवड करू शकेल. मातीचे आरोग्य टिकून ठेवून शेतकऱ्यांनी अधिक उत्पादन घ्यावे हे या योजनेचे मुख्य उद्धीष्ट्य असून शेतकऱ्यांना मातीची गुणवत्ता लक्षात घेऊन त्यांना पीक लावण्यास प्रोत्साहन दिले जाते.

हे ही वाचा (Read This ) आता सातबारा उतारा बंद? राज्य सरकारचा निर्णय

मृदा स्वास्थ कार्ड योजनेबाबत

१. या योजनेअंतर्गत मातीचे परीक्षण करून त्यांना मृदा स्वास्थ कार्ड दिले जाते.
२. मृदा स्वास्थ कार्ड योजना २०२२ चा लाभ देशातील १४ करोड शेतकऱ्यांना घेता येणार आहे.
३. शेतकऱ्यांना त्यांच्या मातीच्या प्रकारानुसार कोणते पीक अनुकूल आहे याची माहिती दिली जाईल.
४. शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत एक रिपोर्ट दिला जाईल त्यामध्ये त्यांच्या माती विषयीची संपूर्ण माहिती दिली जाईल.
५. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना ३ वर्षातून एकदा मृदा स्वास्थ कार्ड दिले जाईल.
६. या योजनेसाठी सरकारने ५६८ करोड रुपयांचे बजेट मान्य केले आहे.

हे ही वाचा (Read This ) रासायनिक, जैविक, सेंद्रिय, शेतीचे अनेक प्रयोग ऐकले पण आता होमिओपॅथिक शेती

मृदा स्वास्थ कार्ड योजना कशी आणि काय काम करते ?

१. तुम्ही या योजनेसाठी अर्ज केल्यानंतर सर्वात पहिले अधिकारी तुमच्या शेतात येऊन मातीचे नमुने घेतात.
२. मातीचे घेतलेले नमुने लॅबोरेटरी मध्ये पाठवले जाते.
३. लॅबोरेटरी मध्ये माती परीक्षण करून त्या माती विषयीची संपूर्ण माहिती मिळवली जाते.
४. त्यानंतर एक सूची बनवली जाते त्या सूचीमध्ये मातीमध्ये असणाऱ्या कमतरता , मातीची गुणवत्ता या गोष्टी दर्शवला जातात.
५. तयार झालेला रिपोर्ट शेतकऱ्याच्या नावासोबत ऑनलाईन अपलोड केले जाते.
६. जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या मातीची माहिती लवकरात लवकर जाणून घेता येईल.

हे ही वाचा (Read This ) आता सातबारा उतारा बंद? राज्य सरकारचा निर्णय

मृदा स्वस्थ कार्डवर कोणती कोणती माहिती उपलब्ध असेल ?

१. मातीचे आरोग्य
२. शेताची उत्पादक क्षमता
३. पोषक तत्वांची कमतरता
४. पाण्याचे प्रमाण
५. इतर पोषक तत्वे
६. शेतीची गुणवत्ता कशी सुधरेल याची माहिती

हे ही वाचा (Read This ) शेतकऱ्यांना दरमहा ३ हजार रुपये पेन्शन मिळणार, असा करा अर्ज

अर्ज कसा करावा ?

१. मृदा स्वास्थ कार्ड साठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला अधिकृत संकेथळावर जाऊन अर्ज करावा लागेल.
२. त्यांनतर लॉगिन पर्यायावर क्लिक करून तुम्हाला तुमचे राज्य निवडावे लागेल.
३. त्यानंतर तुमच्या समोर एक new registration नावाचा पर्याय येईल त्यावर क्लिक करून विचारण्यात आलेली माहिती भरावी.
४. संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करावे लागेल.
५. त्यांनतर होम पेज (home page) वरून तुम्हाला लॉगिन (Login) करावे लागेल.
६. त्यांनतर तुम्हाला युजर नेम (User Name), पासवर्ड (Password) टाकून तुमच्या मातीची माहिती मिळवू शकता.

हे ही वाचा (Read This )  या जिल्ह्यात १०० ड्रोन कृषी सेवा उभारण्याचा निर्धार

अधिकृत वेबसाईट

https://soilhealth.dac.gov.in/

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *