महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना २०२२, मिळणार ५ हजार प्रतिमहा

Shares

सरकार नागरिकांच्या हितासाठी विविध योजना, उपक्रम राबवत असते. अशीच एक महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता (Maharashtra Berojgari Bhatta) योजना महाराष्ट्र राज्य सरकार बेरोजगार युवकांसाठी (Unemployment) राबवत आहे. या योजनेअंतर्गत शिक्षित बेरोजगार युवकांना प्रति महिना ५ हजार रुपये देण्यात येणार आहे. जेणेकरून ते आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करू शकतील. या योजनेअंतर्गत युवकांना नौकरी शोधण्यास मदत देखील केली जाईल.या योजनेची संपूर्ण माहिती आपण आज जाणून घेऊयात.

हे ही वाचा (Read This ) शेतकऱ्यांना दरमहा ३ हजार रुपये पेन्शन मिळणार, असा करा अर्ज

या योजनेबाबत अधिक माहिती
या योजनेअंतर्गत शिक्षित युवकांना दरमहा ५ हजार रुपये देण्यात येणार असून १० वी पास विध्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप तसेच केजी (KG) पासूनचे पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार असून तुमचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे. तुमच्या बँक खात्यासोबत तुमचे आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे.
कित्तेक युवक शिक्षित असूनही रोजगाराची (Employment) संधी उपलब्ध होत नसल्यामुळे त्रासलेले आहेत. त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने बेरोजगारी भत्ता योजना सुरु केली आहे. या योजने अंतर्गत त्यांना रोजगार पुरवला जाणार असून त्यांना रोजगार मिळूपर्यंत बेरोजगारी भत्ता देण्यात येणार आहे.

हे ही वाचा (Read This ) शेतकरी मित्रांनो, SHCS या योजनेचा आपण लाभ घेतला आहे का ?

पात्रता
१. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.
२. कोणत्याही प्रकारची नौकरी किंवा व्यवसाय करणारा नसावा.
३. त्याच्याकड़े उत्पन्नाचे कोणतेही साधन नसावे.
४. वय मर्यादा २१ ते ३५ आहे.
५. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३ लाखापेक्षा कमी असावे.
६. पदवी शिक्षण पूर्ण असावेत.

आवश्यक कागदपत्रे
१. आधार कार्ड
२. ओळख पत्र
३. रहिवासी प्रमाणपत्र
४. पदवी शिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र
५. मोबाईल नंबर
६. पासपोर्ट साईज फोटो

अर्ज कसा करावा ?
१. सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत संकेतथळावर जाऊन Jobseeker पर्यायावर क्लिक करावे लागेल.
२. त्यांनतर Registration पर्यायावर क्लिक करून विचारण्यात आलेली संपूर्ण माहिती भरावी.
३. त्याच पेज च्या खाली तुम्हाला नेक्स्ट (Next) पर्याय दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल तो भरून सबमिट (Submit) बटनावर क्लिक करा.
४. होम पेज वर जाऊन तुमचा युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे.

अधिकृत संकेतस्थळ

https://rojgar.mahaswayam.in/

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *