बैलगाडा शर्यतीसाठी नवीन नियमावली जाहीर

Shares

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्यापासून गाव शिवारामध्ये शर्यतीचे आयोजन केले जात आहे. या शर्यतीमध्ये अनेक बैलजोड्या अगदी उत्साहाने सहभाग घेत आहेत. आता बैलगाडी शर्यतीसाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. काय आहे नवीन नियमावली हे आपण आज जाणून घेणार आहोत.

हे ही वाचा (Read This)  पशुसंवर्धन: उन्हाळ्यात प्राण्याला संसर्ग झाला आहे का ? ते असे तपासा

काय आहे नवीन नियमावली ?

सर्वोच्च न्यायालय आणि शासनाच्या परवानगीनुसार सर्वत्र बैलगाडी शर्यतीचे होत आहेत. मात्र, आता नियमावलीनुसार बैलगाडा शर्यतीचं आयोजन करावं लागणार आहे. आता नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई आणि अनामत रक्कम जप्त केली जाणार आहे. बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्याआधी पंधरा दिवस अगोदर परवानगी घ्यावी लागणार आहे.

तसेच नव्या नियमानुसार बैलांचा छळ करणे, त्यांना उत्तेजक द्रव्य देण्यास मनाई करण्यात आली आहे. एक हजार मीटर अंतराचीही अटही ठेवण्यात आली आहे. अनामत रक्कम, बैलाची शारीरिक तंदुरुस्ती प्रमाणपत्र, शर्यतीसाठी बैलांची छळातून मुक्तता, बैलांना उत्तेजक द्रव्य-मद्याचा वापर न करणे अशा स्वरुपाची नियमावली बैलगाडा र्शयतीसाठी शासनाने लागू केली आहे.

हे ही वाचा (Read This) summer special : उष्मघातापासून संरक्षण करणारे कैरीचे आरोग्यदायी पन्हे

जोरदार बैलगाडा शर्यतींचे आयोजन तर बैलजोडी मालक आनंदात

मागील काही वर्षांपासून बैलगाडा शर्यतीवर बंदी असल्यामुळे सतत भरलेले दिसलेले पट हे बंद झाले होते. आता बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाल्यानंतर मोठ्या संख्येने बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जात आहे.

हे ही वाचा (Read This)  Summer Special : कोकम सरबताचे फायदे आणि रेसिपी

एवढेच काय तर मोठ्या प्रमाणात बैलजोड्या या शर्यतीमध्ये सहभागी होत आहेत. तर तरुण शेतकरी बैलगाडा शर्यतीमध्ये मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत. त्यामुळे आता कोरोनामुळे आलेली मरगळ दूर होतानाचे चित्र दिसत आहे.
बैलगाडा शर्यत सुरु झाल्यापासून बैलजोडीला लाखोंचा भाव मिळत आहे. त्यामुळे बैलजोडी मालक आनंदात दिसत आहेत.

हेही वाचा :- तुमच्या आधार कार्डवर कोणी सीम घेतले का ? जाणून घ्या असे

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *