Summer Special : घामोळ्यांचा त्रास होत असेल तर करा हे उपाय

Shares

यंदा सगळीकडे तापमानात वाढ होतांना दिसत आहे. अश्या कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे अनेक शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. उन्हाळ्यामध्ये घामोळ्यांचा त्रास होणे स्वाभाविक आहे.
या घामोळ्यांमुळे त्वचेवर रॅशेस, त्वचा लाल होणे, खाज येणे यामुळे भयानक त्रास होतो. यासाठी आपण अनेक तात्पुरते पर्याय म्हणून अनेक उत्पादने वापरतो.
मात्र कधी कधी हे उत्पादनापासून रिॲक्शन होण्याचा धोका असतो. त्यामुळे तुम्ही काही घरघुती उपचार करून घामोळ्याची समस्या कमी करू शकता. आपण आज काही सोपे घरघुती उपाय जाणून घेणार आहोत.

हे ही वाचा (Read This) summer special : उष्मघातापासून संरक्षण करणारे कैरीचे आरोग्यदायी पन्हे

उन्हाळ्यात सैलसर आणि सुती कपडे घाला त्यामुळे त्वचा घामाने ओलसर होणार नाही.

एखाद्या ठिकाणी घामोळ्या येण्यास सुरुवात झाली आहे असे वाटल्यास त्याठिकाणी कोरफडीचा गर लावणे किंवा थंड पाण्याने तो भाग धुणे यामुळे खाज कमी होण्यात मदत होते.

जास्तीत जास्त थंड व कोरड्या वातावरणात राहावे. जास्तीत जास्त पाणी प्यावे आणि कलिंगड, खरबूज, काकडी अशी पाणीदार फळे खावीत

कडूलिंबाच्या पानांनी त्वचेचे इन्फेक्शन दूर होण्यास मदत होते. कडूलिंबाच्या पानांची पेस्ट बनवून लावल्याने घामोळयांची समस्या दूर होते. सकाळी अंघोळीच्या पाण्यात कडूलिंबाची पानं उकळवून त्याने अंघोळ केल्यानेही फायदा होतो.

मुलतानी माती आणि गुलाब पाणी एकत्र करुन प्रभावित जागेवर लावा सुकल्यानंतर धुवून टाका. हे मिश्रण आठवड्यातून चार वेळा लावा. तुम्हाला प्रभाव दिसून येईल.

चंदन पावडर आणि गुलाब जल एकत्र करून ही पेस्ट २० ते २५ मिनिटे घामोळ्यांवर लावून ठेवल्यानेही घामोळयांची समस्या दूर होते.

तुळशीची काडी पाण्यात घासून घामोळ्यांवर लावल्याने घामोळ्या दूर होतात.

आवळा सरबत, कोकम सरबत, वाळा किंवा खसचे सरबत द्यावे त्यामुळे आग कमी होऊ शकते.

घामोळी जास्तीत जास्त कोरडी राहतील असे पाहावे. यासाठी घामोळ्यांवर सतत पावडर टाकत राहावी.

हे ही वाचा (Read This)  Summer Special : कोकम सरबताचे फायदे आणि रेसिपी

टीप – कोणतेही उपाययोजना करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

हेही वाचा :- तुमच्या आधार कार्डवर कोणी सीम घेतले का ? जाणून घ्या असे

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *