summer special : उष्मघातापासून संरक्षण करणारे कैरीचे आरोग्यदायी पन्हे

Shares

कैरी असो वा आंबा दोन्हींनी सर्वजण अगदी चवीने खातात. तर या दोघांपासून अनेक चविष्ट पदार्थ बनवले जातात. जे आरोग्याच्या दृष्टीने चांगले असतात. त्यात रणरणता उन्हाळा सुरु झाला की सर्वांना कैरीच्या पन्ह्याची आठवण होते.
कैरीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स, फायबर, विटामिन्स आणि मिनरल्स हे घटक आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

हे ही वाचा (Read This) उन्हाळ्यात प्या हे बहुगुणी ताक

तुम्हाला उष्माघाताचा त्रास होत असेल तर कैरीच्या पन्हाचे सेवन करणे फायदेशीर ठरते. चला तर जाणून घेऊयात कैरीच्या पन्ह्याची रेसिपी.

साहित्य

  • मध्यम आकाराचे ५ ते ६ कच्चे आंबे (कैरी)
  • १५ ते २० पुदिन्याची ताजी पाने
  • अर्धा चमचा काळी मिरी पावडर
  • भाजलेल्या जिऱ्याची पावडर १ चमचा
  • २०० ग्रॅम साखर (तुम्हाला गुळ आवडत असेल तर गुळही घालू शकता)
  • वेलची आणि केशर
  • काळे किंवा पांढरे मीठ चवीनुसार
  • तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यामध्ये बर्फाचे तुकडे टाकू शकता.

हे ही वाचा (Read This) उन्हाळ्यात घ्या खास काळजी, करा या पदार्थांचे सेवन राहाल थंड

कृती

  • कैरी कुकरमध्ये टाकून त्यामध्ये कमीत-कमी २ ग्लास पाणी घाला.
  • कुकरची एक शिट्टी करून घ्या.
  • थोड्यावेळाने कुकर थंड झाल्यावर कैरी काढून घ्या आणि त्यातील पाणी गाळून घ्या.
  • कैरीची साल आणि कोय बाजुला करुन घ्या.
  • गर बाजुला करुन तो मिक्सरला बारिक करुन घ्या.
  • बारीक गरमध्ये भाजलेले जिरे पूड, काळे मीठ किंवा पांढरे मीठ, साखर, पुदिन्याची पाने, वेलची पावडर घालून पुन्हा बारीक करुन घ्या.
  • गरजेनुसार थंड पाणी घालून ढवळा आणि चांगले मिक्स झाले की गाळून घ्या.
  • ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे घाला आणि वरुन केशर घाला.

हे ही वाचा (Read This) या पिकाची लागवड करून बाराही महिने कमवा लाखों रुपये

टीप – शक्यतो कैरी आंबट असावी. जर कैरी आंबट नसेल तर त्याप्रमाणे साखर कमी करावी. तसेच कमी आंबट कैरीचे पन्हे पिताना थोडे लिंबू पिळावे.

हेही वाचा :बँकेच्या वेळा बदलल्या, RBI चा मोठा निर्णय

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *