राज्यमंत्री बच्चू कडू यांना २ महिने कारावासाची शिक्षा

Shares

राज्याचे महिला बालकल्याण व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना २ महिने कारावास आणि २५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवली होती. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.कडू यांच्या विरोधात भाजपच्या नगरसेवकाने तक्रार दाखल केली होती.

ही वाचा (Read This ) सोयाबीन साठवणुकीपेक्षा विक्रीवर भर? लवकरच उन्हाळी सोयाबीनचे आगमन

नेमके काय आहे प्रकरण ?

कडू यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या मुंबईमध्ये असलेल्या फ्लॅटची माहिती लपवली होती. त्यामुळे भाजपाचे नगरसेवक गोपाळ तिरमारे यांनी २०१७ साली कडू यांच्या विरोधात तक्रार नोंदवली होती. या प्रकरणाची सुनावणी अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयात सुरु होती. कडू यांच्या विरोधात लोकप्रतिनिधी कायदा कलम १२५ अ अनुवये गुन्हा सिद्ध झाला आहे.

ही वाचा (Read This ) शेळीपालन आणि कुक्कुटपालन साठी मिळणार 50 लाख रुपये अनुदान

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *