शॉर्टसर्किटमुळे काढणीला आलेला ३० एकरातील ऊस जळून खाक

Shares

यंदा ऊसाला आग लागण्याच्या अनेक घटना समोर येत असून यामध्ये वाढ होत आहे. सर्वात जास्त ऊसाला आग ही शॉर्टसर्किट मुळे लागत आहे. अशीच एक गटानं अहमदनगर मधील पाथर्डी येथे घडली आहे. सुमारे ३० एकरातील ऊस हा जाळून राख झाला आहे. तानपुरेवाडी मधील ऊसाच्या शेतात शॉर्टसर्किटमुले आग लागली असताना अनेकांनी ती वीजवण्याचा प्रयत्न केला मात्र आग मोठी असल्याकारणामुळे ती वीजवणे शक्य झाले नाही. ही आग वाढून शेजारी शेजारी असणाऱ्या शेतात शिरली आणि १० शेतकऱ्यांच्या शेतातील ऊसाने पेट घेतला त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ही वाचा (Read This ) शेळीपालन आणि कुक्कुटपालन साठी मिळणार 50 लाख रुपये अनुदान

शॉर्टसर्किटमुळे लाखोंचे नुकसान, जबाबदार कोण?
ऊसाला आग लागण्याच्या सर्वाधिक घटना या शॉर्टसर्किटमुळे होत आहे. अनेक शेतामधून विद्युत वाहिन्या गेलेल्या असून वाऱ्यामुळे विद्युत तरुणाचे घर्षण होते. त्या घर्षणामुळे एकही ठिणगी शेतात पडली तर त्या एका ठिणगीचा वणवा होतो. या एका ठिणगीमुळे शेतकऱ्यांचे न भरून निघणारे नुकसान होते. मराठवाड्यासह आता पश्चिम महाराष्ट्र्रात देखील या घटना अधिक संख्येने घडत आहेत. महावितरणकडून वेळोवेळी दुरुस्तीची कामे होत नसल्यामुळे अश्या घटना घडण्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण आणि नुकसान भरपाई कोण देणार असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत.

ही वाचा (Read This ) सोयाबीन साठवणुकीपेक्षा विक्रीवर भर? लवकरच उन्हाळी सोयाबीनचे आगमन

१० शेतकऱ्यांचा अंतिम टप्यातील ऊस जाळून राख, तोंडाला आलेला घास पळाला
ऊस सध्या अंतिम टप्यात असून उसाचे पाचरट वाळलेले आहे. अहमदनगर मधील एका शेतामध्ये शॉर्टसर्किटमुळे एक ठिणगी पडली असता शेतास आग लागली ती आग वाढत जाऊन शेजारील शेतात घुसली असं करता करता १० शेतांमध्ये ही आग लागली. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले. ऊस बरोबर शेतीसाठी आवश्यक असणारे इतर साहित्यदेखील जाळून राख झाले. अगदी तोडणीला असलेल्या ऊसाची राख झाल्यामुळे शेतकऱ्यांचा तोंडचा घास पळाला आहे.

हे ही वाचा (Read This ) शेतकरी मित्रांनो, SHCS या योजनेचा आपण लाभ घेतला आहे का ?

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *