कमी जागेत कमी गुंतवणूक करून मिळवा जास्त नफा

Shares

अनेक रेस्टोरंट, हॉटेल, मॉल्स मध्ये छत्री सारख्या दिसणाऱ्या मशरूमचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यातल्यात्यात मशरूम पिकास मागणी बरोबर किंमत देखील जास्त आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा कल मशरूम लागवडीकडे जास्त प्रमाणात वाढत आहे. आपल्याकडे जमीन नसतांना देखील मशरुम शेती करता येते. अगदीच कमी जागेत मशरूम लागवड करता येते. मशरूम लागवडीसाठी जितकी गुंतवणूक केली जाते त्यापेक्षा जास्त प्रमाणात नफा यातून मिळवता येतो. मशरूम लागवड करतांना योग्य नियोजन , व्यवस्थापन केल्यास बक्कळ पैसे मिळवण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे, असे म्हणता येईल. मशरूमच्या बटन मशरुम , आयस्टर मशरुम, मिल्की मशरुम जातींची लागवड केली जाते. मिल्की मशरूमची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.

मशरूमचे उत्पादन घेण्यासाठी कोणत्या साहित्यांची गरज भासते?
१. अंधार असलेली खोली
२. हायड्रोमीटर
३. पेंडा कटिंग मशीन
४. प्लॅस्टिक ड्रम
५. रबर बँड
६. फार्मोलीन
७. फवारणी यंत्र
८. भुसा
९. वजन करणारे यंत्र
१०. गहू पेंढा किंवा भाताचा पेंडा

मशरूम लागवड –
१. तुम्हाला मशरुम लागवड करायची असेल तर कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत तुम्हाला प्रशिक्षण बरोबर संपूर्ण मदत देखील मिळते.
२. भारताच्या हवामानानुसार मशरूमच्या वेगवेगळ्या जातींची लागवड करता येते.
३. मिल्की मशरूमची लागवड उन्हाळ्यात करणे जास्त फायदेशीर ठरते.
४. मिल्की मशरूमची शेती करून अधिक कमाई आपण करू शकतो.
५. मशरूम लागवडीसाठी २८ ते ३८ अंश डिग्री सेल्सिअस तापमान असणे आवश्यक आहे.
६. मशरूम लागवडीसाठी ८० ते ९० % आद्रता असावी लागते.
७. तापमान जास्त असले तरीही मशरूमचे उत्पादन घेता येते.
८. गहुचा किंवा भाताचा पेंढा कपड्याच्या छोट्या पिशवीमध्ये भरून त्यास कमीत कमी १२ ते १६ तास गरम पाण्यात बुडवून ठेवावेत.
९. लागवड करतांना भुसा घालण्यापूर्वी लागवडीची जागा धुवून किंवा पॉलीथीन शीट अंथरून २ % फार्मोलीन मिश्रणाची फवारणी करावीत.

बियाण्यांची पेरणी –
१. पेरणी करतांना १ किलो भुश्यासाठी ४० ते ५० ग्रॅम बियाण्यांची आवश्यकता असते.
२. तयार केलेला पेंडा १६ सेंटी मीटर रुंद आणि २० सेंटीमीटर उंच पीपी बॅग मध्ये टाकावा.
३. साधारणतः पीपी बॅगमध्ये २ ते ३ पृष्ठभाग पेरणी करता येते.
४. त्यानंतर पीपी बॅग बांधून तिला अंधाऱ्या खोलीत ठेवावेत.
५. २ ते ३ आठवड्यापर्यंत तापमान साधारणतः २८ ते ८ डिग्री तसेच आद्रता ८० ते ९० पर्यंत असावी.
६. काही दिवस ओलांडल्यानंतर बॅग बुरशीची आच्छादलेली दिसेल. त्यावर केसिंग करावीत.
७. केसिंग दरम्यान त्यांची देखरेख करणे अत्यंत आवश्यक आहे.
८. त्यातील ओलावा टिकून राहावा यासाठी पाण्याची फवारणी करू शकता.

काढणी –
१. साधारणतः मशरुम ५ ते ७ सेमी पर्यंत झाले की त्यांची तोडणी करावी.
२. तोडणी करून मशरूम पीपी बॅगमध्ये ठेवा.
३. १ किलो भुशापासून आपल्याला १ किलो मिल्की मशरूम मिळवता येते.
४. मिल्की मशरूमची प्रति किलो २०० ते ४०० रुपये दराने विक्री होते.

शेतकरी मिल्की मशरूमची लागवड करून अधिकच नफा कमी जागेत कमी गुंतवणूक करून मिळवू शकतो.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *