या ९० दिवसीय पिकाची लागवड करून मिळवा लाखोंचे उत्पन्न

Shares

शेतकरी अधिक उत्पन्न मिळावे यासाठी विविध प्रयोग करत असल्याचे निदर्शनास आले आहे. आता असा एक आगळा वेगळा प्रयोग कळंब तालुक्यातील एका शेतकऱ्याने केला आहे. त्याने आयुर्वेदिक औषध म्हणून वापर करण्यात येणाऱ्या चिया बियाण्यांचे उत्पादन घेतले असून अगदी ३ महिन्यातच हा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. राज्यातील बाजारपेठेत या बियाण्यांची मोठ्या प्रमाणात मागणी असते. सर्व अभ्यास करून हे पीक घेतले असल्याचे त्यांनी सांगिलते आहे. नेमके चिया बियाणे (Chia Seeds) काय आहे, त्यातून कसा नफा मिळवता येईल हे आपण आज जाणून घेणार आहोत.

हे ही वाचा (Read This ) महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना २०२२, मिळणार ५ हजार प्रतिमहा

चिया बियाणे म्हणजे काय ?
पारंपरिक शेतीपेक्षा अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. अश्याच एका चिया बियाण्यांचे पीक एका युवा शेतकऱ्याने घेतले आहे. चिया बियाणे हे इतर खाद्य बियाण्यांसारखेच आहे. त्यांच्यामध्ये अनेक पोषक तत्वे तसेच औषधी गुणधर्म दडलेले आहेत. हे बियाणे आकाराने लहान असून यांचा रंग हा तपकिरी, पांढरा , काळा असतो.
चिया बियाण्यांमध्ये पोटॅशिअम, फायबर, तांबे, जस्त, सोडियम, मॅगनीस आदी पोषक तत्वे उपलब्ध असतात.

हे ही वाचा (Read This ) शेतकऱ्यांना दरमहा ३ हजार रुपये पेन्शन मिळणार, असा करा अर्ज

कमी वेळ, कमी खर्च, जास्त उत्पन्न
चिया बियाण्यांची लागवड केल्यानंतर साधारणतः ३ महिने १५ दिवसातच उत्पादन मिळण्यास सुरुवात होते. तुम्ही जर साडेतीन एकरात लागवड करत असाल तर त्यासाठी १२ हजार रुपये खर्च येतो तर उत्पन्न मात्र २ लाखापर्यंत मिळते.या बियाण्यांना बाराही महिने मागणी असल्यामुळे याची शेती करणे फायद्याचे ठरते.

हे ही वाचा (Read This ) शेतकऱ्यांना दरमहा ३ हजार रुपये पेन्शन मिळणार, असा करा अर्ज

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *