कापसाच्या दराने शेतकऱ्यांना टाकले संभ्रमात

Shares

दरवर्षीच्या तुलनेत कापसाची लागवड या वर्षी कमी प्रमाणात झाली आहे. खांदेशात देखील कमी प्रमाणात उत्पादन मिळाले आहे. गेल्या काही दिवसांपासून कापसाला मागणी जास्त तर पुरवठा कमी असे चित्र दिसून येत होते. त्यात कापसाला १० हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत भाव मिळत होता. हा भाव सध्या देखील तसाच कायम आहे. या भावात ना वाढ झाली ना भाव कमी झाले. कापसाचे भाव हे तसेच स्थिर दिसून येत आहेत. व्यापाऱ्यांनी आता कापूस खरेदी करण्यावर संयम ठेवलेला दिसून येत आहे. यामुळे मागणी होत नसल्याने शेतकरी थोडा गोंधळला असून कापूस विक्रीसाठी अडथळा निर्माण होत आहे. गेल्या काही महिन्यापासून अशीच गत सोयाबीनची होती. सोयाबीन उत्पादक संभ्रमात होते. नेमके सोयाबीन विक्री करावी की सोयाबीन साठवणूक करावी. असेच काहीसे आता कापूस उत्पादकाचे झाले आहे.

कापसाला यावेळेस काय भाव मिळाला ?
यावेळेस कापसाची १० हजार रुपयांपर्यंत बोली लागली असून असा विक्रमी भाव कापसाला यापूर्वी कधी मिळाला नव्हता. कापसाचे भाव विक्रमी असतांना देखील कापसाची मागणी मोठ्या प्रमाणात होत होती. खरेदीसाठी व्यापाऱ्यांनी अतिशय गर्दी केली होती. अश्यात कापसाचे उत्पादन कमी झाल्यामुळे मागणी जास्त असतांना देखील पुरवठा मात्र कमी होत होता. अश्यात ओमिक्रोन नावाच्या संकटाने हजेरी लावली त्याचा परिणाम कापसाच्या मागणीवर मोठ्या प्रमाणात झाला. कापसाच्या निर्यातीवर बंधने आली . त्यामुळे शेवटच्या टप्प्यात कापसाला कमी किंमत मिळाली. आता मात्र कापसाच्या किमतीत घट होऊन ८ हजार रुपये प्रति क्विंटल वर येऊन थांबली.

अश्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी करावे काय ?
अगदीच अंतिम टप्यात कापसाची वेचणी आहे. सध्या कापसाचे दर हे पूर्णपणे स्थिर आहेत. मात्र भविष्यात कापसाचे दर काय राहतील याचा अंदाज लावता येणार नाही. त्यामुळे कापूस उत्पादकाने सध्या गरजेपुरत्या कापसाची विक्री करावी. बाकी कापसाची साठवणूक करून ठेवावीत. जेणेकरून कापसाच्या दरात वाढ झाली तर शेतकऱ्यांना फायदा होईल आणि जर दरात घट झाली तर जास्त नुकसान होणार नाही.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *