युरिया ऐवजी गोमुत्राचा या पद्धतीने करा वापर, मिळवा भरघोस उत्पन्न

Shares

शेतकरी रोहितकुमार साहू हे इल्या काही वर्षांपासून ग्रीन राईस ( Green Rice ) ची शेती करतात. मात्र त्यांचे आजोबा-पणजोबा यांच्या काळापासून याची शेती केली जाते. परंतु ही शेती रासायनिक खतांचा वापर करून करत असल्यामुळे या तांदळाचा रंग पांढराच असायचा. जेव्हा त्यांनी २०१२ पासून युरिया, पोटॅश यांसारख्या रासायनिक खतांचा वापर करणे बंद करून जैविक पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली त्यानंतर त्या तांदळाचा हिरवा रंग दिसू लागला. मात्र हे तांदूळ ( Rice )मशीनमध्ये गेल्यानंतर त्याचा हिरवेपणा कमी होऊन थोडा पांढरा रंग येतो. त्यांनी जैविक पद्धतीने गोमुत्राचा वापर करून हिरव्या तांदळाची शेती केली आहे. रोहितकुमारच्या युरियाच्या ( urea) जागी गोमूत्र ( Cow Urine) वापरण्याच्या प्रयोगावर इंदिरा गांधी कृषी विद्यापीठातील डॉ. भांबरी असे म्हंटले की , शेतीमध्ये गोमुत्राचा वापर अनेक शेतकरी करतात मात्र युरियाच्या ऐवजी गोमुत्राचा वापर केलेला मी पहिल्यांदा पहिले आहे.

युरियाच्या ऐवजी गोमूत्र वापरणे कितपत योग्य ?
गोमूत्रामुळे पिकास कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. याचा वापर कीटकनाशक म्हणून देखील केला जातो. गोमूत्रामध्ये नायट्रोजन सोबत काही प्रमाणात फॉस्फरस देखील उपलब्ध असून नायट्रोजन पिकांसाठी अत्यंत महत्वाचे असते. युरियामध्ये मोठ्या प्रमाणात नायट्रोजन उपलब्ध असल्यामुळे शेतकरी युरियाचा वापर करत असतो. युरियाची टंचाई निर्माण होऊ लागली आहे. शेतकरी पिकांची उत्तम वाढ व्हावी म्हणून युरियाचा वापर करत असतो. युरियामध्ये जवळपास ४६% पर्यंत नायट्रोजन उपलब्ध असते, असे कृषी वैज्ञानिकांनी सांगितले आहे. मात्र आता युरियाच्या ऐवजी गोमूत्र वापरता येते हे वैज्ञानिकांनी देखील तपासून सांगितले आहे. गोमूत्र नायट्रोजनची कमतरता पूर्ण करतो. त्यामुळे इतर खतांपेक्षा जैविक खतांचा वापर करणे शेतकऱ्यांनी पसंद केले आहे.

हे ही वाचा (Read This) या फळाची लागवड करून मिळवा १०० % अनुदान

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *