चक्क, लिंबाचे दर रोखण्यासाठी तंत्र-मंत्र पूजा, मंदिरात दिला बळी

Shares

सध्या सोशल मीडिया पासून वर्तमानपत्र सगळीकडे लिंबूच्या दराची चर्चा सुरु आहे. अनेकांनी तर त्यावर विनोद देखील बनवले आहेत. लिंबूच्या दराने यंदा रेकॉर्ड ब्रेक केले आहे.

लिंबूचा वापर हा आहाराबरोबर दरवाज्यात, दुकानात लटकावण्यासाठी देखील केला जातो. तर इतकेच काय लिंबूचा वापर हा इतरांवरील समस्या, अडथळे दूर करण्यासाठी तंत्रपूजेत देखील केला जातो. मात्र आता याच लिंबाच्या दारावरती समस्या आल्यामुळे चक्क लिंबूचा बळी दिला जात आहे.

हे ही वाचा (Read This) पोल्ट्री उद्योग अडचणीत, उत्पानांपेक्षा खर्च जास्त तर अंडयांच्या दरात घसरण

मंदिरात तंत्रपूजा करत दिला बळी

लिंबाच्या वाढत्या दरामुळे हैराण झालेल्या भगतसिंग युवा ब्रिगेडनं आदिशक्ती मंदिरात तंत्रपूजा करत लिंबाचा बळी दिला आहे. लिंबाचा भाव गगनाला भिडला असून तंत्र पूजेचा मुख्य घटक लिंबूच आहे. लिंबूच्या दरवाढीचा उद्रेक सर्व घराघरांत पोहोचला आहे. गेल्या महिनाभरापासून लिंबाच्या किमतीत सातत्यानं वाढ होत आहे, त्यामुळं लिंबू खरेदी करणं अवघड बनलंय त्यामुळे लिंबाचा बळी देऊन येत्या २ ते ३ दिवसात लिंबाचे दर कमी व्हावेत अशी प्रार्थना करण्यात आली.

हे ही वाचा (Read This)  आता नोकरी १२ तासांची, पगार पण कमी, पीएफ वाढणार- १ जुलैपासून मोदी सरकार लागू करणार नवे नियम ?

एक लिंबू १५ रुपयांना

घराच्या दरवाज्याला, दुकानाला, हातगाडीला अनेक जण लिंबू मिरची टांगतात. हे लिंबू मिरची ५ रुपये दराने मिळत होते ते आता २० रुपयांना मिळत आहे. त्यामुळे आता लिंबू मिरची टांगावे की नाही असा प्रश्न पडला आहे. तर एक लिंबू हे १५ रुपयांना मिळत आहे.

हे ही वाचा (Read This) वकील गुणरत्न सदावर्ते यांना जमीन मंजूर, मात्र…

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *