सोयाबीन अंतिम टप्यात मात्र शेतकरी अजूनही गोंधळात

Shares

खरीप हंगामात अंतिम टप्प्यात असलेले सोयाबीन (Soybean) तसेच कापसाची (Cotton) निम्म्याहून अधिक प्रमाणात शेतकऱ्यांनी साठवण करून ठेवलेली आहे. यांच्या भावात सतत होणारी घसरण , स्थिरता , कमी- जास्त आवक यामुळे शेतकरी सावधपणे सोयाबीन बाबत पाऊल उचलत होता. आता उन्हाळी सोयाबीन येणाच्या मार्गावर असल्यामुळे साठवणूक केलेल्या सोयाबीनचे काय करावे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. मागील ४ दिवसांपासून सोयाबीनला चांगला भाव (Rate) देखील मिळत आहे. त्यामुळे शेतकरी (Farmers) आता काय निर्णय घेतलीत यावर सर्व अवलंबून आहे.

सोयाबीनच्या आवकमध्ये वाढ परंतु दरात स्थिरता
संपूर्ण मराठवाड्यातून लातूर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार (Agriculture Market) समितीमध्ये सोयाबीन विक्रीसाठी दाखल होत आहे. लातूरमध्ये (Latur) सोयाबीन प्रक्रिया उद्योग असल्यामुळे येथून सोयाबीनला मोठ्या प्रमाणात मागणी केली जाते. सोयाबीनला मागील काही दिवसांमध्ये ६ हजार ३०० रुपये भाव मिळत होता. आता त्यात गेल्या आठवड्यात सुधारणा झाली आहे. याचा परिणाम आवक वर देखील झाला आहे असे निदर्शनात आले आहे.

हे ही वाचा (Read This) या फळाची लागवड करून मिळवा १०० % अनुदान

कृषी तज्ज्ञांनी काय दिला सल्ला ?
सोयाबीन दरात सुरुवातीपासूनच चढ-उतार होत असतांना दिसून आला आहे. मात्र शेतकऱ्यांनी संपूर्ण बाजारपेठेचा अभ्यास करून सोयबीनचे निर्णय घेतले आहे. काही दिवसांपूर्वी सोयाबीनला अगदी कवडीमोलाचा दर मिळत होता तेव्हा शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवणुकीवर जास्त भर दिला होता. आता सोयाबीनच्या दरात वाढ झाली असून आवक देखील वाढली आहे. आता उन्हाळी सोयाबीनचे लवकरच आगमन होणार आहे अश्यात साठवलेल्या सोयाबीनचे काय करावे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. तरीही शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री ही टप्याटप्याने करावी. सोयाबीन दरात आता पुन्हा चढ – उतार झाल्यास शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसू नये याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी, असे कृषी तज्ज्ञांनी सांगितले आहे.

शेतकरी काय निर्णय घेणार ?
शेतकऱ्यांनी जर अशीच टप्याटप्याने आवक केली तर दर कायम राहून शेतकऱ्यांना फायदा होईल. मात्र उन्हाळी सोयाबीन आता येणाच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकरी सोयाबीनची विक्री करतो की साठवणूक करून ठेवतो याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. शेतकऱ्यांनी संपूर्ण बाजाराचा अभ्यास करून निर्णय घेतला तरच त्यांना लाभ मिळेल.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *