अशी करा आल्यापासून सुंठ निर्मिती ! संपूर्ण प्रक्रिया …

Shares

आपल्या आहारात कळत-नकळतपणे आल्याचा समावेश होतो. आपलाच सामान्य भाषेत आद्रक देखील म्हणले जाते. या आल्यापासून विविध पदार्थ बनविले जातात. यासाठी आल्याचे कंद स्वच्छ धुऊन मातीपासून वेगळे करावे आणि व्यवस्थित वाळवून घ्यावे.आल्याच्या कंदापासून खारे आले, आलेपाक, आल्याचे सरबत, वाळलेले आले आणि आल्याचे लोणचे बनवितात.
सुंठ तयार करण्यासाठी लागणाऱ्या आल्याची काढणी परिपक्व झाल्यानंतर करावी. ते पूर्ण वाढलेले, निरोगी असावे. सुंठीसाठी वापरायचे आले अधिक तंतुमय असू नये. यामुळे उत्तम प्रतीची सुंठ तयार होते आणि नफा देखील चांगलाच होतो.
सुंठ तयार करण्याच्या पद्धती मलबार पद्धती:
या पद्धतीमध्ये स्वच्छ केलेले आले सुमारे ८-१० तास पाण्यात ठेवले जाते. नंतर त्याची साले काढून २% चुन्याच्या द्रावणात ६-७ तास भिजत ठेवले जाते. यानंतर त्यांना द्रावणातून काढून बंद खोलीत ठेवले जाते. याठिकाणी आल्याच्या कंदाला १२ तास गंधकाची धुरी देण्यात येते. यात बंद खोलीत गंधक जळत ठेवले जाते. त्यानंतर कंद बाहेर काढून दोन टक्के चुन्याच्या द्रावणात सहा तास भिजत ठेवतात व परत 12 तास गंधकाची धुरी देतात.
हीच पद्धती तीन वेळा करावी लागते, यामुळे आल्याच्या कंदांस पांढरा रंग प्राप्त होतो. प्रक्रिया केलेल्या ह्या आल्यांना सूर्यप्रकाशामध्ये वाळवले जाते व गोणपाटामध्ये घालून स्वच्छ केले जाते. याच प्रक्रिया केलेल्या आल्याला सुंठ म्हणतात.
सुंठ सोडा व खास मिश्रण पद्धती:
या पद्धतीमध्ये आले स्वच्छ करून घावे आणि ८-१० तास पाण्यात भिजत ठेऊन त्याची साल काढून घ्यावी. नंतर १.५ X २ फूट आकाराच्या गॅल्व्हनाइज्ड जाळीच्या पिंजऱ्यामध्ये आले भरून घ्यावे. तीन वेगवेगळ्या भांड्यांमध्ये सोडिअम हायड्रॉक्‍साईडची 20 टक्के, 25 टक्के आणि 50 टक्के तीव्रतेची द्रावणे तयार करून उकळून घ्यावीत. उकळलेल्या या द्रावणांमध्ये कंदाने भिजलेला जाळीचा पिंजरा 20 टक्के द्रावणामध्ये पाच मिनिटे, 25 टक्के द्रावणामध्ये एक मिनीट आणि 50 टक्के द्रावणामध्ये अर्धा मिनीट धरावा. नंतर पिंजऱ्यातील आले चार टक्के सायट्रिक ऍसिडच्या द्रावणात दोन तास बुडवून ठेवावे. या प्रक्रियेनंतर ते चांगले निथळून स्वच्छ सूर्यप्रकाशात वाळत घालावे. साल राहिली असल्यास चोळून काढावी.
अशा प्रकारे उत्तम प्रतीची सुंठ तयार करण्यात येते. कुठलीही प्रक्रिया करण्यापूर्वी जाणकार व्यक्तीकडून माहिती व मार्गदर्शन घेतल्यास आल्याची गुणवत्ता उत्तम राहते.
व्हिडिओ स्वरूपात पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा

ब्युरो रिपोर्ट – किसानराज डेस्क

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *