पपई पीक संकटात, बळीराजाच्या चिंतेत भर

Shares

बदलत्या वातावरणाचा परिणाम सर्वात जास्त फळ पिकांवर झाला असून पपई वर मोठ्या प्रमाणात बुरशीचा प्रादुर्भाव झाला आहे. पपई झाडाची पाने तर पिवळी होऊन जमिनीवर पडू लागली आहे. सुरुवातीला कोरोनाचे संकट त्यांनतर अतिवृष्टी , अवकाळी अश्या सततच्या येणाऱ्या नैसर्गिक संकटांमुळे पपईचे पीक धोक्यात आले आहे. या बुरशीनाशकामुळे शेतकऱ्यांना अधिकच खर्च वाढला आहे. शेतकऱ्यांनी आधीच उत्पादन चांगले यावे यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. त्यात आता बुरशीनाशक, औषधे यांचा अधिकचा खर्च यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

हे ही वाचा (Read This ) शेतकऱ्यांना दरमहा ३ हजार रुपये पेन्शन मिळणार, असा करा अर्ज

पपई पीक संकटात, खरेदी करण्यास नकार
बदलत्या वातावरणाचा पिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून नंदुरबार मध्ये सात हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पपई पिकाची लागवड करण्यात आली आहे. परंतु, उत्तर भारतात पपईला मागणी नसल्याचे कारण देत व्यापारी पपई खरेदी करण्यास तयार नाहीत. तर दुसरीकडे ढगाळ वातावरणामुळे पपईची फळे झाडावरच पिकत असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. पपई अगदी कवडीमोल दरात विकायला शेतकरी तयार असूनही खरीददार पपईची खरेदी करण्यास नकार देत आहेत.

हे ही वाचा (Read This ) या ९० दिवसीय पिकाची लागवड करून मिळवा लाखोंचे उत्पन्न

महागड्या औषधांचा काहीही उपयोग नाही..
पपई पिकावर मोठ्या प्रमाणात बुरशीचा प्रादुर्भाव झाला असून शेतकऱ्यांनी उत्तम उत्पादन यावे आणि बुरशीचा नाश व्हावा यासाठी महागड्या औषधांची फवारणी केली. मात्र याचा काडीचा परिणाम बुरशीवर झाला नाही. तर औषधांचा खर्च हा वाया गेला. त्यामुळे पपई उत्पादक हे संकटात सापडले आहे. बुरशी बरोबरच पिकांवर इतर रोगांचाही प्रादुर्भाव झालेला आढळून येत आहे. रोगांमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. तसेच झाडांची पानं पिवळी होऊन जमिनीवर गळून पडत आहेत. याचा थेट परिणाम हा फळांच्या वाढीवर होत आहे.

हे ही वाचा (Read This ) शेतकरी मित्रांनो, SHCS या योजनेचा आपण लाभ घेतला आहे का ?

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *