कोरडवाहू क्षेत्रात मटका सिंचन ठरते फायदेशीर

Shares

महाराष्ट्रात फळबाग लागवडीची संख्या वाढत चालली आहे. परंतु हवामानात होणाऱ्या सततच्या बदलामुळे फळबाग पिकास धोका उदभवत आहे.फळपिकांखाली असलेल्या क्षेत्रांची काळजी घेणे गरजेचे ठरत आहे.सूर्यप्रकाश झाडांसाठी महत्वाचे आहे परंतु पाणी देखील अत्यंत महत्वाचे आहे.ठिबक सिंचन यावर अत्यंत उत्तम उपाय आहे.परंतु ठिबक सिंचन आर्थिकदृष्टया थोडे महागडे असल्यामुळे अनेक शेतकऱयांना ही उपाययोजना करणे शक्य होत नाही. अश्या परिस्थितीत कमी खर्चात ठिबक सिंचनाचे फायदे देणारे एक सोपे तंत्र म्हणजे मटका सिंचन. पिकास योग्य प्रमाणात पाणी नाही मिळाले तर त्याची वाढ खुंटते त्यामुळे झाडांची मर होण्याची शक्यता असते.उन्हाळ्यात भरघोस उत्पादनासाठी फळझाडांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. झाडे आपल्या मुळांद्वारे पाणी शोषून घेतात त्याचा उपयोग झाडांच्या वाढीसाठी होतो तर उरलेले पाणी बाष्पोत्सर्जनाने पानांद्वारे निघून जाते. झाडे जमिनीतील अन्नद्रवे मुळांद्वारे शोषून घेऊन आपल्या सर्व शाखांपर्यंत पोहचवतात. त्यासाठी पाण्याची आवश्यकता भासते. तर आपण जाणून घेऊयात मटका सिंचनाची माहिती.

मटका सिंचन-
१. ६ ते ७ लिटर पाणी बसेल अशी झाडांच्या वाढीनुसार १ ते २ वर्षासाठी मटकी निवडावीत.
२. १० ते १५ लिटर पाणी बसेल अशी जास्त वयाच्या झाडांसाठी मटकी निवडावीत.
३. पक्क्या भाजलेल्या मटकीची खाली लहान छिद्रे पाडावेत. त्यामध्ये कापड किंवा नारळाची शेंडी घुसवून ठेवावी जेणेकरून जास्त पाणी झिरपणार नाही.
४. प्रत्येक झाडास २ मटकी बसवावीत. त्यासाठी मटक्याच्या आकाराचा खड्डा खोदून घ्यावा.
५. मटका पुरण्यापूर्वी त्याखाली शेणखत घालावे.

मटका सिंचनाचे फायदे –
१. मटका सिंचनाचा उपयोग केला तर पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होते.
२. मटका सिंचनासाठी खर्च कमी लागतो.
३. झाडांची एकसारखी चांगली वाढ होते.
४. मटका सिंचन उन्हाळ्यात पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढवते.
५. कडक ऊन असेल तर झाडास जीवदान देण्याचे काम मटका सिंचन करते.
६. मटका सिंचनामुळे मुळांचे मजबूत जाळे तयार होते.

ज्या शेतकऱयांना ठिबक सिंचन , तुषार सिंचन करणे शक्य नाही अश्या शेतकऱयांना कोरडवाहू पिकास मटका सिंचन वरदान ठरू शकते.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *