शेतीमधे तंत्रज्ञान शेतकर्याच्या दृष्टीने का महत्त्वाच..! एकदा वाचाच

Shares

नमस्कार मंडळी

एकच कळकळीची विनंती आहे कि कोणतेही नवं तंत्राची माहिती न घेता ते शेतात वापरणे हे आपल्या व शेती च्या दृष्टीने घातक आहे.शेती मधे नवीन तंत्र तर वापरले पाहीजे असे वाटत असेल तर त्यांचा फायदा व तोटा पाहून नियोजन करता येते हे महत्वाचे आहे.पण काही गोष्टींचा आपन विचार करतंच नाही शेती मधे काय योग्य आहे व काय नाही हे समजणे महत्त्वाचे आहे.आता हेच पहा जिवामृत हे शेती साठी योग्य आहे व कीती प्रमाणात वापर करावा हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. जिवामृत म्हणजे कोटी जीवाणू चे अस्तित्व व विरजन होय!जिवामृता मधे गायीच गोमूत्र व शेण वापरले जाते त्यात हजारों जिवाणुंचा समावेशअसतो तसेच त्यामध्ये वडाखालची माती वापरतो कारण त्यात गांडुळांची अंडबिजे असतात.वड हे एकमेव असा वृक्ष आहे तो भर उन्हाळ्यात देखील पक्षांना फळे व आश्रय  देतो. त्या झाडावर बसणारे पक्षाची विष्टा हि गांडुळांच अन्न म्हनुन उपयोगी पडते.

ही वाचा (Read This) आनंदाची बातमी! शास्त्रज्ञांनी कांद्याची एक नवीन जात केली विकसित, हेक्टरी उत्पादन 350 क्विंटल आणि लवकर खराब न होणारी !

वडाच्या घनदाट सावलीमध्ये गारवा टिकुन राहील्या मुळे तेथे वर्षभर गांडुळ हे सक्रिय असतात.आपन समजावें कि जिथे गांडुळ असते तिथली माती जिवाणु ने परीपुर्ण असते. जिवामृता मधे शहद कींवा गुळ वापरतात कारण त्यातील ग्लुकोज जिवाणुंसाठी उर्जा म्हनुन काम करते पण कोणी सहसा शहद वापरत नाही कारण ते थोडे महाग जाते. दुसरं म्हणजे  हरभरा डाळीचे पिठ त्या मधे वापरतात कारण त्याद्वारे विविध प्रोटीन चा पुरवठा त्यामुळे होतो.जिवाणुंना गुळ व मधा मधुन ग्लुकोज मिळतो व जिवाणुंचा काउंट हा  वेगाने होतो हे समजणे फार महत्त्वाचे आहे ! त्यांच्या मुळे रासायनिक व सेंद्रिय पदार्थांचे चिलेशन होते व मातीचा पिएच हा नॅार्मल होण्यास मदत होते !आता हेच बघा कि ह्युमस हा घटक जिवाणुंच्या अन्नसाखळीचा निर्माता आहे.कर्ब व पोषक पदार्थ झाडांच्या मुळांना मिळत असते. पुरेसे पोषण मिळाले तर त्यांची संख्या काही वेळात दुप्पट होते!

कमी कष्टात जास्त उत्पन्न मिळवायचे असेल तर नेहमी मागणी असलेल्या काळ्या मिरीची लागवड करा.

थोडक्यात समजून घेऊ की आपन दुधात विरजन टाकले की काही वेळात दही बनवण्याची प्रक्रिया चालु होते व ते दही बनतं कारण कि जिवाणू ची वाढ वेगात होत असते तोच नियम जिवामृत मधे लागु होतो व याच नियमाने जिवाणुंची संख्या वाढते. म्हनजे जर जमिनित ह्युमस किंवा सेंद्रिय कर्ब भरपूर असेल तर जिवाणुंची नैसर्गिकपणे चांगली वाढ होते व ते टिकुन रहाते.त्याच कारणामुळे जमिनीचे आरोग्य चांगले रहाते व खतांचे अपटेक वेगाने होते. पण आपन जनावरानां जर निकस चारा खाऊ घालुन त्याच तयार झालेल्या शेणखतापासुन जिवामृत बनवत असेल तर अशा निकस सेंद्रिय घटकांपासुन बनणारी जीवामृत हे जिवाणुंना कितपत योग्य पोषण देऊ शकेल हा एक अभ्यासाचा भाग आहे.आपन जिवामृत चा वापर करतो हे चांगले आहे पण जिवाणू पोषनासाठी केवळ त्यावर अवलंबुन रहाणे कितपत योग्य आहे.आपण लक्षात ठेवले पाहिजे!

खरिपात पांढरे सोने बहरणार : कृषी तज्ज्ञांचा अंदाज, कापसाखालील क्षेत्र वाढेल, विक्रमी दर मिळण्याची शक्यता ?

पुढच्या पिढिने आनंदाने शेतिकडे वळावे असे वाटत असेल तर त्यांना शेती मधलं वीज्ञान व नविन तंत्रज्ञानाची जोड देने आवश्यक आहे  हे जर शेतकऱ्यांच्या भाषेत सांगायचे तर पातेल्यात दुध असेल तर विरजन टाकुन दहि बनेल पण जर पातेल्यात दुधच नसेल तर विरजन काय उपयोगाच राहील तसे जिवामृत हे विरजन आहे जमिनित पुरेसे सेंद्रिय किंवा रासायनिक घटक नसताना वापर केला तर असंतुलन निर्माण होण्यास कारणीभूत ठरतो परिणामी शेतीतिल आर्थिक गणित बिघडते व नुकसान हे आपल्याला सोसाव लागतं!  सेंद्रिय शेती करणारे शेतकरी या गोष्टीपासून अज्ञानी आहेत की जीवमृतातील जिवाणूद्वारे निर्माण होत.ह्युमस मधे मोठ्या प्रमाणात घट झालीय की ते मातीची सुपिकता तर कमी होतेच पण साधं जिवामृत हे आपल्या पिकांची तात्पुरती गरज भागवु शकत नाही .त्या मागे वेगळं कारणं आहे तो म्हणजे शेतातला बायोमास वाढला व ऑरगॅनिक मॅटर कमी झाला तर जिवाणु झाडाकडून व माती मधून कर्ब ग्रहण करणार साहजिकच CN रेशो बिघडतोच नत्राचे प्रमाण खुप वाढुन जाते व फक्त झाडा मधे वाढ होत रहाते हे समजणे महत्त्वाचे आहे…..

धन्यवाद

Save the soil all together
Mission agriculture soil information
मिलिंद जि गोदे

milindgode111@gmail.com
शेती बलवान तर शेतकरी धनवान

हेही वाचा :- सोशल मीडियावर मैत्री पडली महागात ; तरुणाने केला तरुणीवर अत्याचार

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *