शेती बाबत शेतकऱ्यांचा दृष्टीकोन व तथ्य ! एकदा वाचाच

Shares

नमस्कार मंडळी

आज शेती विषयक पारंपरिक शेती मधले विज्ञानाच तथ्य माहीत करूया आपला शेतकरी निसर्गपुजक हे सर्वाना माहिती असेल पण या शेती मधल्या काही गोष्टी चां आपन उलगडा करूया आपले वडील आजोबा जेव्हा कापुस पेरणी शेती मधे करायचे तेव्हा ही कापुस बियाण्याला माती लावायचे व एक दोन कांदे त्या मधे असायचे याचं कारण काय असेल, त्या मागे खुप मोठं विज्ञान आहे कापुस ला माती लावण्याचे कारणं म्हणजे माती लावलेल्या बियाण्यास पक्षी,उंदीर,की किटक खात नाही व दुसरं म्हणजे शेती मधे एक दोन तरी कांदे लावायचे त्या मागचे कारण कांद्याच्या पाने हिरवे असल्याने येणारे रोग ओळखण्यास मदत होत होती त्यामधे ति सुपिक माती बियाणे उगवण्यासाठी मदत करतं असते आज आपन ति संस्कृती विसरलो आहे.

हे ही वाचा (Read This)  या पिकाची लागवड करून मिळवा १० वर्षापर्यंत भरघोस नफा

पावसाचा अंदाज आपले पुर्वज चांगल्या तर्हेने लावत होते ते म्हणजे संकेत देणारे किट जसे की मुंगी व माकोडे हे जमिनीतून माती काढते व कावळा आपले घरटे झाडाच्या उंच फांदीवर करतं असतात.चिमण्या आपले अंग पाण्याने भिजवते.खुप काही असे तथ्य आहे.आपली शेती ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघणे महत्वाचे आहे आपल्या वंशजांना माहिती होत्या त्या मधली म्हणजे सांकेतिक पिकं शेतामध्ये असायला पाहीजे व आता शेतात मधे पिवळे चिकट सापळे का लावतात?याही गोष्टी चां उलगडा करूया पिवळे सापळे जितकें चांगले तितकेच वाईट आता ही गोष्टीच तथ्य पाहू या आपन जेव्हा शेतामध्ये चिकट सापळे लावतो त्याला आकर्षीक होऊन शत्रू किटका सोबत मित्र किटक ही त्या सापळ्याला आकर्षित होतात नुकसान आपलेच आहे.

हे ही वाचा (Read This)  भारतीय गव्हाला जगात वाढली मागणी, एकूण 1 दशलक्ष टन गहू निर्यात, गव्हाला अजून चांगला दर मिळणार ?

निसर्गाशी शेतकरी जुळुन असल्याने त्याला सर्व बारकावे माहीतअसतात. आपल्या शेतातील मुळ समस्या आहे कीट व्यवस्थापन या बद्दल थोडं समजून घेऊ आपण दिवाळीमधे दिप लावतो, घरात दारात शेणखत जेथे असेल तेथे शेतामध्ये याचं कारण कि जी वेळ असते ती किटक प्रजननाची जेव्हा आपन आपल्या शेतामध्ये दिप लावतो त्या दिप कडे आकर्षण होऊन किट मरण पावतो श्रावण महिन्यात किड व किटकाचा प्रादुर्भाव जास्त असतो.मि या गोष्टीचा बारकाईने अभ्यास केला की या मागे काही वैज्ञानिक दृष्टीकोन आहे कारण आपली शेतीची संस्कृती महान आहे.व तत्वावर आधारित आहे. या सर्व गोष्टी चां उल्लेख कृषी पराशर या संस्कृत ग्रंथात सुद्धा आहे.सितादहीच्या बाबतीत तर सांगितलेच आहे.खुप असे शेती बाबत दृष्टीकोन आहे.आपले पुर्वज कधी शेणाच्या स्लर्या करत नव्हते कारण त्यांचा विश्वास शेणखतावर जास्त होता.आजचा विश्वास रासायनिक खतांवरआहे.

हे ही वाचा (Read This)  शेवगा लागवड करून मिळवा अधिक उत्पन्न, सरकार देणार अनुदान


आज आपन पाहीले तर संत्रावर डायबॅक ,तुर व हरभरा वरील मर हे सर्व मातीच्या आत असलेले जिवाणू व मित्र किटक मित्र बुरशी प्रतिसाद देत नाही या ला कारण रसायनांचा अतोनात वापर व जमिनिला विश्रांती न देणे या सर्व कारणांमुळे त्यांच्यावर उपास मारीची वेळ आली आहे. शेतामधल्या गोम,विचुं,हे तर मातीतुन गायब झाल्या सारखेच आहे. आता वेळ आहे विचार करण्याची व समजुन घेण्याची मातीला पुन्हा जिवंत करण्याची विचार बदला जिवन बदलेल


Save the soil all together
Mission agriculture soil information
मिलिंद जि गोदे
9423361185

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *