तुळशीचा असा वापर केल्याने तब्बेत राहील ठणठणीत..!

Shares

वेगवेगळ्या आजारांवर गुणकारी ठरणाऱ्या तुळशीचे महत्त्व आपल्या सर्वांनाच माहित आहे. तुळस आशिया, युरोप आणि आफ्रिका खंडांमध्ये बऱ्याच ठिकाणी आढळते. ऑक्सिजन देणाऱ्या या तुळशीच्या नुसत्या घरात असण्याने सुद्धा वातावरणात प्रसन्नता येते. परिसरात असणारी तुळशीमुळे ब-याच आजारांपासून आपल्याला सुटका सुद्धा मिळते. आयुर्वेदामधील कित्येक उपायांमध्येसुद्धा तुळस अतिशय गुणकारी आहे.

आजार आणि काढ्यांमध्ये तुळशीचा वापर कसा करावा याबाबत सर्वांना माहित आहे पण हीच तुळशीची पाने रोज दुधात उकळून पिल्यामुळे मोठ्या आजारांपासून सुटका होऊ शकते.

• मूतखड्याचा त्रास होत असल्यास रिकाम्या पोटाने नियमितपणे तुळशीचे दूध प्यावे. असे केल्याने मूत्रपिंडातील मूतखड्याचा त्रास दूर होतो आणि त्रास कमी होऊ लागतो.

• तुळशीच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडेंट असल्यामुळे ते शरीराची प्रतिकारशक्ती वाढवायला मदत करतात. त्याचबरोबर तुळशीमध्ये अँटीबॅक्टीरियल आणि अँटीवायरल गुण असतात. सर्दी – खोकल्यापासून वाचण्यासाठीसुद्धा याचा फायदा होतो.

• तणाव, नैराश्यासारख्या समस्यांमध्ये जर दुधात तुळशीची पाने उकळून घेतली आणि गार करून दररोज हे दूध पिले तर डोके शांत ठेवण्यासाठी मदत होते.

• डोकेदुखीमध्ये तुळस आणि एक चिमूटभर हळद दुधात पिल्यास आराम मिळतो. ही डोकेदुखी वारंवार होत असल्यास दररोज सकाळी तुळस आणि दूध प्यावे ज्यामुळे आराम मिळतो आणि मायग्रेनसारखा भयंकर आजारामध्ये सुद्धा आराम मिळण्यास मदत होते.

• श्वासोच्छवासाची समस्या, दमा यांसारख्या आजाराचा त्रास असेल तर तुळशीची पाने दुधात उकळवून घ्या. यामुळे दम्याच्या रुग्णांना फायदा होईल. श्वास घेण्याचा त्रास सुद्धा कमी होईल.

अशी ही गुणकारी तुळस म्हणजे सुदृढ आरोग्यासाठी गुरुकिल्लीच आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *