आपल्या शेतीचे भविष्य अंधारात आहे ! एकदा वाचाच

Shares

नमस्कार मंडळी मि मिलिंद जि गोदे पुन्हा आपल्या सेवेत आजची परिस्थिती पाहता आपल्या शेती चे भविष्य अंधारात आहे.ही गोष्ट थोडी नकारात्मक वाटेल पण ते आपल्या साठी विचार करण्यासारखी आहे

हा लेख थोडा आपल्या साठी डोळे उघडण्यास मदत करेल, आज काल सोशल मिडिया काही जण शेतकरी यांना नकारात्मक विचार यावा यासाठी करणारे मेसेज टाकत असतात आपल्या साध्या मनाच्या शेतकर्यांच्या मनाला असे मेसेज , भयानक चटके देत असतात व दहशत निर्माण करत असतात परंतू या गोष्टी चा राग मानू नका या सर्व कारणाला आपन सर्व जबाबदार आपन आहे. या शेतकर्याचे दु:ख काय आहे हे आपन समजून घेतच नाही ….

वांग्याच्या लागवडीतून शेतकरी कमवू शकतात लाखोंचा नफा, जाणून घ्या कोणती असावी प्रगत जाती आणि माती

या वर्षात तर अशी परिस्थिती होती की कोणाला पीक झाले तर कोणाला काहीच नाही पिक नाही आले याचे कारण आपन पाहु पिकासाठी लागणार वातावरणात अवेळी बदल व नापिक जमिन यामुळे जसे पाहीजेत तसे उत्पादन झाले च नाही दुसरे म्हणजे शेती मधे ढोर मेहनत करून पिकवलाच तर मातीमोल भावात उत्पादन विक्री करावी लागली.आपल्या समस्यांचे कारण काय आहे कि आपन नविन काही स्विकारले नाही. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपला शेतकरी वर्ग अपडेट नाहीच सर्व चांगलें पाहीजे मग शेती मधे तंत्रज्ञान भुतकाळातले का?काही औषधांचे नावे , ब्रॅंड , मॅालीक्युलस बदलले पण तंत्रज्ञान तर तेच आहे.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: नॅनो-डीएपीला दोन दिवसांत अधिकृत मान्यता, नेहमीच्या खताच्या तुलनेत निम्म्या भावात मिळणार

शेती मधे पिकांना एकतर वेस्ट खाऊ घालायचे वर ते कुजवायला डिकंपोझर विचार करून सांगा कि निकस काडी कचरा टाकून पिकाचे पोषन होईल की शोषन हाच मोठा यक्षप्रश्न आहे. आतातरी भुतकाळाच्या झोपेतून जागे व्हा आपल्या शेत बद्दल नकारात्मक मानसिकता तुमची प्रगती होऊ देत नाही , पिकाकडे फक्त पैशाचे साधन म्हनून पहायचे.आधी शेती मधे भरभक्कम केमिकल वापरायचे मग मन वळले किंवा वैतागून अशास्रीय पद्धतीने शेती करतो पुन्हा जैविक शेती करायचे नंतर जमिनीतला सुपिकतेचा स्टॅाक संपला की शेती पिकानेच बंद होते. मग काय,घरघर फिरनार्या कंपन्यांच्या मार्केटींग करनार्या लोकांकडून मिळनार्या पोकळ आश्वासने भुलून आंधळा विश्वास ठेवायचा शेवटी सगळीकडून पडलो की रडणं चालू शासनावर दोष देणं चालू

पीठ आणि खाद्यतेल होणार स्वस्त ! गव्हाबरोबरच तेलबियांच्या क्षेत्रातही बंपर वाढ झाली आहे.

लोकांकडून सहानुभूती मिळवन्याचा प्रयत्न करायचा आपल्याच रडगाण्याला एकमेकांनी लाईक करायचे अरे भावांनो , बंद करा त्या माय जमिन विष चारने पिकांना विष पाजने ,अत्याचार करने जीने हजारो वर्ष पिढ्यान पिढ्या आमचे पालन पोषन केले तिला आम्ही आज मारण्याचा प्रयत्न चालू आहे. निर्जीव व नापिक करून टाकलंय. चुकिच्या मार्गदर्शकांच्या संगतीने तिचे शोषन करून तिला दरिद्री व विषारी करून टाकले तिला संजीवनी द्या , ती पुन्हा मरनाच्या दारातून बाहेर येईल पण आधी तिची झीज भरून काढायची तयारी ठेवा.मायभूमि आपल्या लेकराला असे तडफडताना पाहू शकत नाही, परंतू पहिले तिला शुद्धीवर ऐण्यासाठी प्रयत्न एकदा करणे काळाची गरज आहे. माती सुपिक झाली की धरतीपुत्रांचे ऐश्वर्य पुन्हा मिळवून देईन राव मित्रहो आता सगळीकडे फक्त केमिकल्सचे फलक दिसतेय.

भारत हा जगातील सर्वात मोठा बासमती निर्यातदार आहे, जाणून घ्या कोणते देश आपला तांदूळ खातात

आता जिकडे तिकडे दिसतात जाहीरात दिखाऊ प्रचार यांच्या मागे पळनारे मला आश्चर्य वाटते मानसिकतेत अपयश मिळाले की दुसर्यांमुळे आले व यश आले की माझ्यामुळे मिळालं हे शुद्ध अज्ञानपणा आहे , एकीकडे अभ्यासपुर्वक शेती करनारा मोठा वर्ग तयार होतोय जो शेतीत मोठे यश मिळवतोय, नोकर्या सोडून नियोजनपुर्वक शेती करून यशस्वी शेती करताहेत मोठं मोठ्या उलाढाली करत आहेत व त्याच भागात एक वर्ग असा आहे जो अभ्यास न करता भारी भारी रसायने मारुन गंजून गेला आहे.

आत्तापासून तयारीला लागा, आंब्याच्या झाडाला रोगराई येणार नाही, बंपर उत्पन्न मिळेल

परिस्थीती प्रत्येकावर येते परंतू बिनडोक नियोजन , इतरांचा प्रभावाखाली निर्णय ,फक्त तात्पुरता उत्पादन मिळते म्हनून आपल्या शेतात पिकनारे पिक फक्त बाजारापर्यंत कसे पोहोचले पाहिजे एवढीच अपेक्षा ठेवने मग तो एकदा धान्य बाजारात व्यापार्याच्या गळ्यात मारला की आपन खुश होऊन जातो. महत्वाचे म्हणजे मग त्याचे पुढच्याचे काय हाल होतील याचा विचारही न करने अश्या गोष्टी अपयशाला कारनीभूत राहते. शेतकरी मित्रांनो एक थोडं लक्षात घ्या जर आपन विकलेल्या त्या मालामध्ये टिकाऊपणा नसेल तर तो वाहतुकी मधे खराब होत असेल व व्यापारी वर्ग तोट्यात जात असेल तर तो मालची खरेदी करणे बंद करतो.

चांगली बातमी! इफको लवकरच नॅनो डीएपी आणणार, त्याची किंमत पारंपारिक खतांपेक्षा खूपच कमी असेल

दुसरे महत्त्वाचे म्हणजे त्याला पौष्टीक दर्जेदार माल हवा असतो.आपल्या शेतात विषारी केमिकल व माॅलीक्युल वापरून पिकवलेला शेतमाल घरी घाबरत घाबरत थोडाफार खातो तो लोकांनी भरपूर पैसे देऊन विकत घ्यावा हे तुमच्या बुद्धीला कितपत योग्य वाटतं व मनाला पटतं हे देव जाणे,याचा परिणाम काय तोच सक्षम नाही राहीला तर माल कोण घेणार मित्रहो गरज आहे वजनदार व दर्जेदार शेती उत्पादनाची सोबत आज मागणी वाढलीय , सोयी सुविधा वाढल्या , ट्रान्सपोर्टचे नवे पर्याय समोर आले परंतू ग्राहकांना हवा असलेला विषमुक्त व पौष्टीक माल तुम्ही पिकवता का?शेतीचे भविष्य उज्ज्वल आहे परंतू यासाठी जबाबदारी घ्यावी लागेल ,अभ्यासाने नियोजनबद्ध शेती करा मंडळी. मि सोशल मिडिया वर समुह त्यासाठीच काढले आहे.

आता द्राक्ष पिकातून रोग होतील दूर, मिळेल बंपर उत्पादन, बाजारात उतरला हा खास ‘स्टनर’

शेतकर्यांना प्रेरणा देणे व त्यांचे मार्गदर्शन करने हा माझा एकमेव उद्देश आहे . परंतू काही लोक करतात भलतीच ट्रीटमेंट आणि चांगले काही पोस्ट करन्याऐवजी निगेटीव्ह मेसेज पोस्ट करून इतर शेतकर्यांची मानसिकता बिघडविन्याचा प्रयत्न करतात,त्यांना वाटते की , आम्ही असे करून लोकांना जागे करत आहोत , परंतू त्यांची अवस्था आपन लहानपणी शिकलेल्या त्या सशाच्या गोष्टी सारखी आहे , तो ससा जसा सर्व प्राण्यांना, आभाळ पडले पळा पळा म्हनून घाबरवतो तसे तो पळायला भाग पाडतो, ह्या नकारात्मक मेसेज टाकनार्यांचे त्या सशाप्रमाणे हाल आहे. सतर्क रहा.

खाद्यतेल स्वस्त होणार? देशातील या बाजारात तेलबियांचे भाव घसरले

मित्रहो जागरूक बना , शिका समृद्ध व्हा…!
स्वताच्या अभ्यासाने शेती करा , मदत लागली तर हाक मारा आपल्यासाठी…
मातीला बलवान करा , पिक पहिलवान होईल आणि क्वालीटी असेल तर शेतकरी धनवान होणारच…
आता वेळ आहे मरनाच्या दारात लोटलेली माती पुन्हा जिवंत करण्याची… धन्यवाद

मिलिंद जि गोदे

(युवा शेतकरी)

Save the soil all together

milindgode111@gmail.com

विचारांची दिशा बदला जिवनाची दशा आपोआप बदलेल……….

बासमती आणि बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीत वाढ, एकूण निर्यात 125 लाख टन पार

चांगली बातमी! राज्यातील भातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार ३० हजार, मुख्यमंत्र्यांनी घोषणा

शुभ मंत्र: नवीन वर्षात या 9 मंत्रांनी मनोकामना पूर्ण होतील आणि आनंदात खूप वाढ होईल

खुप खुप धन्यवाद मंडळी……

बासमती आणि बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीत वाढ, एकूण निर्यात 125 लाख टन पार

चांगली बातमी! राज्यातील भातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार ३० हजार, मुख्यमंत्र्यांनी घोषणा

शुभ मंत्र: नवीन वर्षात या 9 मंत्रांनी मनोकामना पूर्ण होतील आणि आनंदात खूप वाढ होईल

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *