सावधान! शेती संपावर जाणार आहे

Shares

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

विषय थोडा गंभीर आहे आपन शेतकरी संप,बस संप,हमाल संप बॅंक संप, आपन या पेक्षा ही संप बघितले असेल किंवा वाचण्यात आले असेल पण शेती संपावर जाणार आहे हे ऐकलं नसेल व वाचलेलं ही नसेल शेतकरी हा जेव्हा उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करतो.या मातीला देण्यासाठी काहीच नसते फक्त फक्त कर्ब उपसण्याचे काम!त्या मधे रासायनिक खतांचा बेसुमार वापर आपल्या पूर्वजांची दिलेलं दान म्हणजे सुपिक व कसदार जमिन होय.आज तिची अवस्था इतकी खराब केली आहे की आपन त्या गोष्टी चां विचार ही करु शकत नाही.

रासायनयुक्त खते व कीटकनाशक यांच्या अती वापरामुळे, शहरांमधल्या विषारी घनकचरा मातीत मिसळल्यामुळे आपल्या मातीची सुपीकता कमी होते. नैसर्गिक बदलांमुळे, आपण केलेल्या चुका या मुळे मृदेची सुपीकता कमी होत जाते. व कालांतराने जमीन नापीक होईल का या गोष्टीची चिंता लागली आहे. जास्त सिंचनाने शेतजमिनीत क्षारांचे प्रमाण वाढले त्याच बरोबर जमिनीचा सेंद्रीय कर्बही अत्यंत कमी झाल्या नेअन्नद्रव्यांचे संतुलनही बिघडले.कोठे कोठे तर मातीचा हा थर हा मर्यादीत असतो, अशा ठिकाणी धूपेमुळे संपूर्ण मातीचा थरच हा वाहून जातो आणि परीनाम खडक उघडा पडतो. अशा ठिकाणी भविष्यात पुन्हा शेती करणेच अशक्यप्राय होऊन बसेल.

आपन शेती मधिल मातीची शेणखत व कंपोस्ट खताची गरज पूर्ण करू शकत नाही. ज्यामुळे जमिनीचा पोत हा खालावत आहे सेंद्रिय पदार्थ शेत जमीनीत टाकण्याचे प्रमाण कमी झाले. पर्यायाने जमिनीचे आरोग्य बिघडणेस मदत झाली. सुपीक असलेल्या जमिनी नापीक होतं चालल्या. शेतकरी हा खतांच्या वापरामुळे मोठा फायदा होतो असे वाटले पण शेती ची प्रकृती सुधारण्याऐवजी बिघडत गेली. जादा उत्पादनाच्या हव्यासापोटी मिळण्याऐवजी पिकाला आवश्यकतेपेक्षा जास्त खत दिल्यामुळे शेती उत्पादन कमी येऊ लागले, त्याचबरोबर खरोखरच आवश्यक असलेल्या सेंद्रिय खतांकडे दुर्लक्ष झाले.

पिकाला आवश्यक नसतानाही जड पाणी दिल्याने क्षाराचे प्रमाण वाढत गेले. त्या जमिनीत पीक येईनासे झाले. जमीन नापीक झाली, क्षारपड झाली. खते आणि पाणी यांच्या अधिकाधिक वापराने अधिकाधिक उत्पादन घेण्याची हाव ही आपल्या महागात पडली व आपलाच अतिरेक आपल्या अंगलट आला. तात्पुरत्या यशाच्या नादात आपल्याला शेतजमिनीचे आजारपण लक्षात आले की नाही देव जाणे.शेती क्षेत्रासाठीचीचिंताजनक बाब आहे. हे जर असेच चालु राहीले तर शेती ही सुपिकते पासुन वंचित राहील!त्या वेळी तिला ही शेतकर्यांचा विरोधात संप पुकारावा लागेल….

ध्यास सेंद्रिय शेती चा शेती बलवान तर शेतकरी धनवान

Save the soil all together

मिलिंद जि गोदे

9423361185

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *