शेतकऱ्यांना कांदा रडवतोय, दरात घसरण

Shares

मागील काही दिवसांपासून कांद्याची आवक वाढली असून ही दर स्थिरच होते. यावेळेस खरीप हंगामातील कांद्याचे आगमन बाजारामध्ये जरा उशिराने झाले. तरीही त्याचा दरावर काही परिणाम झाला नाही. तर सोलापूर कृषी उत्पन्न बाजारपेठेत विक्रमी आवक होऊन देखील दर स्थिरच होते.

आता उन्हाळी हंगामातील कांद्याचे आगमन बाजारामध्ये झाले असून मागणीत वाढ झाली आहे तर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ५५० रुपयांची घसरण झाली आहे. तर नाशिक, अहमदनगर व पुणे जिल्ह्यातील चाकण आणि सोलापूर या भागातही नवीन उन्हाळ कांद्याची लाल कांद्याच्या बरोबरीने आवक येत असल्याने याचा थेट परिणाम कांद्याच्या दरावर होतांना दिसून येत आहे.

कांद्याच्या दरात झालेला बदल …

शनिवारी १ हजार २३३ वाहनातून १७ हजार ८२६ क्विंटल कांद्याची आवक लासलगाव बाजार समितीत दाखल झाली कमाल २६२५ रुपये, किमान ६५१ रुपये तर सर्वसाधारण २१०० रुपये प्रतिक्विंटल ला बाजार भाव मिळाला होता तर आज सोमवारी १ हजार ८०० वाहनातून ३२ हजार ५०० क्विंटल कांद्याची आवक लासलगाव बाजार समितीत दाखल झाली कमाल २०७७ रुपये, किमान ९०० रुपये तर सर्वसाधारण १७५० रुपये प्रतिक्विंटल ला बाजार भाव मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंतीत झाला असून आता पुढे काय असा प्रश्न त्यांना पडला आहे.

हे ही वाचा (Read This ) लाल पत्ताकोबीच्या मागणीत वाढ, मिळवून देईल अधिकच नफा

युक्रेन – रशिया युद्धाचा कांदा निर्यातीवर परिणाम

युक्रेन – रशिया युद्धाचा परिणाम आता कांदा निर्यातीचा रस्ता अडवण्याची शक्यता आहे. असा अंदाज सचिव नरेंद्र वाढवणे यांनी व्यक्त केला आहे. कांद्याची निर्यात ही कंटेनरच्या माध्यमातून होत असून सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहनांना सहजासहजी परवानगी मिळणे अवघड आहे.

वेळेवर कांद्याची निर्यात न झाल्यास कांदा खराब होतो. त्यामुळे स्वतःच्या रिस्क वर कांद्याची निर्यात करावी लागणार आहे. त्यामुळे कांद्याचे घटते दर, निर्यातीवरील निर्बंध यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता काही संकटांचा सामना करावा लागणार आहे.
त्यामुळे निर्यातीबाबत केंद्र सरकारने धोरण ठरवावेत अशी मागणी सचिव नरेंद्र वाढवणे यांनी केली आहे.

हे ही वाचा (Read This ) आधुनिक शेती काळाची गरज, व्हर्टिकल फार्मिंग

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *