तांदुळजा भाजीचे महत्व ऐकून धक्का बसेल.

Shares

तांदुळजा ही आयुर्वेदीक औषधी वनस्पती भारतात उगवते.शरीरात सी जीवनसत्व साठी तांदुळजा ची भाजी खावी ही भाजी मधुर रसाच्या गुणांनी समृद्ध व शितविर्य अशी आहे. याचा आहारामधे उपयोग करणे आवश्यक आहे.

तांदुळजाचे फायदे आणि गुणधर्म –
१. उष्णतेच्या तापात विशेषतः गोवर कांजण्या व तीव्र तापात फार उपयुक्त आहे.
२.  विष विकारी, नेत्र विकारी, पित्त विकारी, मूळव्याध, यकृत व पाथारी वाढणे या विकारांत पथ्यकर म्हणुन जरूर वापरावी.
३. महारोग, त्वचेचे समस्त विकार या मध्ये दाह, उष्णता कमी करावयास तांदुळजा फार उपयुक्त आहे.
४. नाजूक प्रकृतीच्या व्यक्ती करिता, बाळंतीण, गरोदर स्त्रिया यांच्यासाठी वरदान आहे.
५. बाळंतीणीला दूध वाढवण्यास ही भाजी उपयोगी असते.
६. डोळ्याच्या विकारांत आग होणे, पाणी येणे, डोळे चिकटने या तक्रारी करिता फार उपयुक्त आहे. ७. डोळे तेजस्वी होतात जुनाट मलावरोध विकारात आतड्यात चिकटून राहिलेला मळ सुटा व्हायला तांदुळजा भाजी उपयुक्त आहे.
८. तांदुळजा पातळ भाजी वृद्ध माणसांच्या आरोग्यासाठी जास्त उपयुक्त आहे.

तांदुळजा सूप-
हे सूप आरोग्यासाठी फारच लाभदायक मानले जाते. तरीही बरेच जन सूप नापसंत करतात. लहान मुलांना सूप फार आरोग्यदायी असते. हे लवकर पचते आणि त्यातील पोषके पटकन मिळविले जातात. तांदुळजा पासून बरेच डिशेस बनविले जातात. त्यापैकी तांदुळजाचे सूप एक सुंदर पदार्थ मानले जाते.

साहित्य:
१.५ ते २ कप कापलेला तांदुळजा
१ ते ४ बारीक कापलेला हिरवा कांदा
४-५ लसून पाकळ्यांना बारीक कापून
१ चम्मच बेसन
१ चम्मच जिरे पावडर
१ तेजपान
२ कप पाणी
१.५ चम्मच बटर
क्रीम
किसलेले पनीर
काळे मिरे बारीक पिसलेले
मीठ

कृती:
१. सर्वप्रथम धुतलेली व चिरलेली तांदुळजा फ्रीज मध्ये ठेवावी.
२. पॅनमध्ये १ चमचा बटर घेवून त्यात १-२ मिनिटे तेजपान तळू द्या.
३. त्यात कापलेला लसण व कांदा बारीक कापलेला सोडा त्यांना जळू द्यायचे नाही.
४. कांदा लसण हलके लाल होईपर्यंत भाजा यात फ्रीजमधील कापलेला तांदुळजा घाला. ४-५ मिनिटे हलवत राहा.
५. यात मीठ व काळे मीठ घाला यात बेसन घाला.
१ मिनिट हे मिश्रण चांगले हलवा.
६. यात २ कप पाणी घाला. यातील तेजपान काढून घ्या.
७. हे मिश्रण गॅसवर चांगले उकडून घ्या. ४-५ मिनिटे कमी तापमानावर ठेवा
८. त्यात वरून जिरे पूड घाला, नंतर गॅस बंद करा.
९. त्यात क्रीम टाकून चांगले ढवळा.
१०. त्यात अर्धा चमचा साखर घाला.
११. हे थंड झाल्यावर ब्लेंडर मध्ये घालून ह्याचे मुलायम असे पातळ सूप होऊ द्या.
१२. मिश्रण गॅसवर ठेवा, आणि ह्यात काळे मीठ आणि काळे मिरे पूड टाका.
१३.वरून किसलेल्या चीझ ने सजवा.
टिप:
१. ह्यातील साखर ही तांदुळजाचा रंग कायम ठेवते.
२. ताज्या तांदुळजास जास्त वेळ शिजवू नये.
३. हे सूप तसेच खाऊ शकता किंवा ब्रेडसोबतही खाल्ले तर उत्तम स्वाद येईल.

तांदुळजाची भाजी
साहित्य:
तांदुळजाची भाजी १ जुडी
४-५ लसूण पाकळ्या
मीठ
तेल
हिरवी मिरची
जिरे, मोहरी

कृती:
१. तांदुळजाची पाने निवडून घ्यावीत. कोवळे दांडे देखील घ्यावेत.
२. स्वच्छ पाण्यात भाजी २-३ वेळा धुवुन घ्यावी.
भाजी चिरुन घ्यावी.
३. कढईत तेल तापवून घ्यावे. कढई लोखंडाची असेल तर उत्तम.
४. तेलात लसूण, जिरे मोहरी, मिरची चिरुन घालावी.
५. वरुन चिरलेली भाजी घालून मीठ घालावे.
६. गॅस कमी करुन कढई २-३ मिनीटे झाकून ठेवावी.
७. थोड्यावेळान भाजी नीट मिसळावी.
८. कोरडी करावी.
टिप:
१. भाजी अती शिजवू नये.
२. मिरची घालणार असाल तर शक्यतो उभी चिरुन घालावी म्हणजे काढुन टाकता येते. 

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *