कोथिंबीरची लागवड अगदी सोप्या पद्धतीने..

Shares

कोथिंबीर हे रोजच्या जेवणात वापरणारी एक महत्वपूर्ण वस्तू आहे.कोथिंबीर ला बाजारात वर्षभर मागणी असते.प्रत्येक मसाल्याच्या भाजीमध्ये कोथिंबीरचा  वापर केला जातो तसेच धनिया पावडरचा सुद्धा वापर केला जातो.

जमिन आणि हवामान –
१. कोथिंबीर पिकासाठी मध्यम ते कसदार आणि मध्यम खोलीची जमीन लागते.
२. तसेच जमिनीत सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण भरपूर प्रमाणात असल्यास हलक्‍या किंवा भारी जमिनीत सुद्धा याची लागवड आपण करू शकतो.
३. कोथिंबीरीची लागवड कोणत्याही प्रकारच्या हवामानात करता येते.
४. कोथिंबीरची लागवड केल्यानंतर कोथिंबिरच्या बारीक कोमवार जोराचा किंवा जास्त पाऊस पडला तर कोथिंबिरचे कोम खराब होतात.
५. तसेच कोथिंबीर २५ ते ३० दिवासाचे झाले व जास्त प्रमाणात पाऊस झाला तरीही कोथिंबिरचे पिक खराब होते.

कोथिंबीरीच्‍या जाती –

  1. वैशाली
  2. व्ही एक
  3. व्ही दोन
  4. को एक
  5. डी बारा
  6. डी चवदा

लागवड पद्धती –
१. जमिनीची पूर्ण तयारी करताना शेत चांगले नांगरून घ्या.
२. त्यानंतर ३ बाय २ मीटर आकाराचे सपाट वाफे आखून घ्यायची.
३. त्या वाफेत चांगले कुजलेले शेणखत टाकून मातीत मिक्स करून घ्यावे.
४. वाफे सपाट करुन बी सारखे पडेल या हिशोबाने फेकून बी हे खत मातीने झाकून थोडेसे पाणी द्यावे.
५. बाकीचे पिकांना देतो  तितके पाणी कोथिंबीरला लागत नाही. कोथिंबीरला थोड्या प्रमाणात पाणी द्यावे.

बीज प्रक्रिया-
१. थायरम तीन ग्रॅम प्रति किलो बियाणे बीज प्रक्रिया करावी.
२. कोथिंबीरची लागण्यासाठी हेक्‍टरी ६० ते ७० प्रति किलो बी लागते.
३. पेरणीपूर्वी बियाण्याची चांगली उगवण होण्यासाठी बियाणे धने फोडून बिया वेगळ्या करावे.
४. यासाठी धने लाकडी फळीने फोडावे.
५. तसेच पेरणीपूर्वी धण्याची बी बारा तास पाण्यात भिजवून ठेवावे आणि नंतर ते लागवडीसाठी वापरावे.
६. यामुळे काय होते तर बियांची उगवण ८ ते १० दिवसात होते.
७. तसेच उत्पादनात देखील वाढ होते व कारणी सुद्धा पीक लवकर येते.

खत व्यवस्थापन –
१. कोथिंबीरची  चांगल्या वाढीसाठी बी पेरण्यापूर्वी चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळणे आवश्‍यक आहे .
२. तसेच पेरणीच्या वेळी १०० किलो नत्र ,५० किलो स्फुरद, ५० किलो पालाश देणे आवश्यक आहे.
३. त्यातील नत्र हे अर्धे द्यावे व पडदा राहिलेले नत्र वीस ते पंचवीस दिवसांनी द्यावे.
४. बी  उगवून आल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसांनी नत्र द्यावे.
५. जर कोथिंबिरीचा कळवा धरणार असेल तर कापणी केल्यानंतर हेक्टर ४० किलो देणे आवश्यक आहे.

पाणी व्यवस्थापन –
१. लागवडी पूर्वी शेत ओलावून घेणे हे आवश्यक आहे.
२. त्यामुळे उगवण क्षमता वाढते.
३. पाणी देण्यासाठी सारी पद्धतीचा वापर करावा. ४. लागवडीनंतर हलकेसे पाणी द्यावे.
५. यामुळे बी वाहून जात नाहीपुढचा मुद्दा म्हणजे रोग व किडी तर कोथिंबिरीवर रोग व किडी जास्त आढळून येत नाही.
६. काहीवेळा भुरी रोगाचा प्रादुर्भाव होतो पाण्यात विरघळणारे गंधक त्याची फवारणी करावी.
७. ठिबकच्या किंवा कलर तुषार स्प्रिंकलर च्या साह्याने लागवड केली किंवा त्या पद्धतीने पाणी दिले तर कोथिंबीर चांगले होते व आपल्या उत्पन्नात वाढ होते.

कोथिंबिरीची काढणी –
१. कोथिंबीर हे ४० ते ४५ दिवसात पीक काढणीस येते.
२. याची काढणी  फुले येण्याच्या सुरुवात होण्यापूर्वी करावी.
३. कोथिंबीर ही हिरवी आणि कोडी लोकल फिट असताना काढणी करावी.
४. उंच वाढलेली परंतु फुले येण्यापूर्वी कोथिंबीर उटुंब अथवा कापून त्याची काढणी करावी.
५. त्यानंतर कोथिंबीरची जोडी बांधून बाजारात विकायला न्यावी.

कोथिंबीर पीक घेतांना घ्यावयाची काळजी –
१. जमिनीमध्ये चांगले कुजलेले शेणखत किंवा सेंद्रीय खताचा वापर जास्त प्रमाणात करावा कारण त्या जमिनीमध्ये कोथिंबीर पीक चांगले होते.
२. सर्व खत नियोजन व पाणी व्यवस्थापन याची काळजी घेऊन आपण कोथिंबीर ची लागवड करावी.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *