भाजीपाला निर्यात करण्यासाठी आवश्यक आहेत ही कागदपत्रे !

Shares

कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवून देणाऱ्या भाजीपाला पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढत चालला आहे. अनेक तंत्रज्ञानाचा वापर करून चांगल्या दर्जाचा भाजीपाला पिकवता येतो. या भाजीपाल्यांची निर्यात मोठ्या संख्येने परदेशी केली जात आहे. जेणेकरून त्यातून अधिक नफा मिळवता येईल. परंतु भाजीपाला निर्यात करण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता असते. आपण आज शेतमाल निर्यात करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची माहिती जाणून घेणार आहोत.शेतमाल आयात करण्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे उपलब्ध झाले झाले तरीही एक सर्वात मोठा प्रश्न पडतो तो म्हणजे आयातदार कसा शोधावा? याची देखील माहिती आपण जाणून घेणार आहोत.

शेतमाल निर्यात करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे –
आयात निर्यात परवाना –
१. भाजीपाला निर्यात करायचा असेल तर आयात निर्यात परवाना काढणे अनिवार्य आहे.
२. आयात निर्यात परवाना काढण्यासाठी संस्था नोंदणी पत्र, भारत आयकर विभागाकडून मिळालेला खाते क्रमांक, पासपोर्ट साईज फोटो, सहसंचालक विदेशी व्यापार यांच्या नवे असलेला डिमांड ड्राफ, A -४ आकाराचे पाकीट, ३० रुपयांचा पोस्टल स्टॅम्प ही कागदपत्रे असणे गरजेचे आहे.

शेतमाल सुरक्षा हमी पत्र –
१. आपण निर्यात करणारा माल हा सुरक्षित आहे याचे हमीपत्र असणे आवश्यक आहे.
२. शेतमाल सुरक्षा हमी देण्यासाठी आरोग्य विषयक प्रमाणपत्र, पॅक हाऊस प्रमाणपत्र, सॅनिटरी प्रमाणपत्र, ग्लोबल गॅप प्रमाणपत्र आदी कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

शेतमाल निर्यात करण्यासाठी आयातदार कसा शोधावा ?
१. आयातदारची अपेडा सारख्या संस्थांच्या वेबसाइड द्वारे माहिती मिळू शकते.
२. संस्थांच्या वेबसाइड वरून आयातदाराचा संपर्क क्रमांक मिळवता येतो .
३. आयातदाराचे तपासणीचे काम एक्सपोर्ट क्रेडिट गॅरेंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही शासकीय संस्था करते.

शेतकऱ्यांनी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करून निर्यातीची संपूर्ण तांत्रिक माहिती मिळवली तर शेतकऱ्यांना भाजीपाला निर्यातीत कोणताही अडथळा येणार नाही.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *