सबसिडीसह घ्या या योजनेचा फायदा, ओसाड किंवा पडीक जमिनीवर सोलर प्लांट लावून दर महिन्याला मिळवा निश्चित उत्पन्न

Shares

शेतकर्‍यांना अनेकदा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आणि पीक सिंचनादरम्यान वीज खंडित झाल्यामुळे नुकसान देखील होते . अशा परिस्थितीत पीएम कुसुम योजना शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. या योजनेंतर्गत केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांना सोलर पंपावर सबसिडी देतात. सोलर पंप वापरून शेतकरी आपल्या शेतात सिंचन करू शकतात.

ही वाचा (Read Thisसौर कृषिपंप कुसुम योजना, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य

याशिवाय तुम्ही तुमच्या ओसाड जमिनीवर किंवा पडीक जमिनीवर सोलर प्लांट लावून दर महिन्याला निश्चित उत्पन्न मिळवू शकता. तज्ज्ञांच्या मते, एका मेगावॅटच्या सौरऊर्जा प्रकल्पासाठी सुमारे ४ ते ५ एकर जमीन लागते. याद्वारे एका वर्षात सुमारे 1.5 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती होऊ शकते. वीज विभागाकडून सुमारे 3 रुपये 7 पैसे दराने त्याची खरेदी केली जाते. अशा परिस्थितीत, एक शेतकरी सोलर पंप प्लांटमधून वर्षाला 45 लाख रुपयांपर्यंत सहज कमाई करू शकतो.

हे ही वाचा (Read Thisबदक पालनातून शेतकऱ्यांना मिळणार अतिरिक्त उत्पन्न, कोंबड्यांपालना पेक्षा सोपे आहे

कुसुम योजनेंतर्गत, शेतकरी गट, शेतकरी पंचायती, सहकारी संस्था सौर पंप बसवण्यासाठी अर्ज करू शकतात. या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना ६० टक्के अनुदान देते. याशिवाय, कर्जाच्या किमतीच्या 30% रक्कमही सरकार देते. या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांना केवळ 10 टक्केच खर्च करावा लागणार आहे.

हे ही वाचा (Read This ) या फुलाची लागवड करून मिळवा अधिकाधिक उत्पन्न, एक फुल ५० रुपये

केंद्रासह राज्य सरकारे आपापल्या स्तरावर त्याचे व्यवस्थापन करतात. अशा वेळी शेतकरी आपापल्या राज्यातील ऊर्जा विभागाशी संपर्क साधून इतर माहिती मिळवू शकतात. या योजनेंतर्गत, शेतकरी 10,000 मेगावॅटचा विकेंद्रित नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प पडीक जमिनीवर उभारतील, जो पडीक जमिनीवर ग्रीडशी जोडला जाईल. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर कृषी पंप बसवण्यासाठी 17.50 लाख रुपयांचा निधीही दिला जातो.

ऑफिसियल वेबसाइट

https://mnre.gov.in/

हे ही वाचा (Read This ) एका एकरात लागवड करा मिळवा ६ लाख रुपये, बाराही महिने करता येते लागवड

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *