या फुलाची लागवड करून मिळवा अधिकाधिक उत्पन्न, एक फुल ५० रुपये

Shares

शेतकरी शेती व्यवसायात वेगवेगळे प्रयोग करत आहेत. प्रयोग पुणे येथील ३ ते ४ शेतकऱ्यांनी केला आहे. त्यांनी मूळच्या हॉलंडमधील असणाऱ्या अँथेरियम या फुलाची लागवड करत पारंपरिकतेला फाटा दिला आहे.

हे ही वाचा (Read This ) व्वा रे पठ्या – ५ एकर कलिंगडाच्या उत्पन्नातून घेतले १३ लाख रुपये

अँथेरियम हे फुल हॉलंड देशातील असून हे अत्यंत आकर्षित असते. या फुलाची लागवड या शेतकऱ्यांनी अत्याधुनिक पद्धतीने केली आहे. अँथेरियम हे फूल विविध प्रकारच्या सात रंगांमध्ये आहे. या फुलाच्या लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात भांडवल लागते, त्यामुळे सामान्य शेतकरी या फुलाच्या उत्पादनाकडे फारसा वळतांना दिसत नाही. मात्र या शेतकऱ्यांनी या फुलाची लागवड करण्याचे धाडस केले आहे.

हे ही वाचा (Read This कमीत कमी पाण्यात करा या पिकाची लागवड, मिळवा भरगोस उत्पन्न

अँथेरियम हे फुल ७ रंगांमध्ये उपलब्ध आहे. या फुलाचा वापर मुख्यतः मोठे हॉटेल्स, कॉर्पोरेट असेच मोठेमोठे डेकोरेटर्स करतात. या फुलाची किंमत अधिक असल्या कारणामुळे साधारणतः सर्वसामान्य नागरिक या फुलाची खरेदी करत नाहीत. या फुलाची किंमत ३० रुपये इतकी असते तर किरकोळ बाजारपेठेत हे फुल ५० ते ६० रुपयांपर्यंत विकले जाते.

या फुलांची लागवड करताना ती टिश्युकल्चर प्लांट असल्यामुळे ते हॉलंडवरून आयात करावे लागतात. तसेच, लागवडीच्या वेळी मातीचा वापर न करता रॉक ऊल हे आर्टिफिशियल वापरले जाते. एकदा लागवड केल्यानंतर ते झाड वर्षाला साधारणपणे आठ फुले देते. लागवडीनंतर सहा ते सात महिन्यांत छोटी फुले येतात. मात्र, वर्षभरानंतर ती विक्री योग्य होतात.

हे ही वाचा (Read This ) एका एकरात लागवड करा मिळवा ६ लाख रुपये, बाराही महिने करता येते लागवड

अधिक दीर्घकाळ टिकते हे फुल

या शेतकऱ्याने ४७ गुंठ्यांमध्ये अँथेरियम या फुलाची लागवड केली असून त्यासाठी तब्बल दीड कोटी रुपयांचा खर्च केला आहे. पुणे जिल्ह्यात एकूण या फुलांचे तीन प्रकल्प आहेत. अँथेरियम हे फूल झाडावरून तोडल्यानंतर साधारणपणे १८ ते २० दिवस टिकते. दरम्यान, त्याची विक्री होत असल्याने त्याला शीतगृहात ठेवण्याची गरज भासत नाही.

या फुलाची लागवड भारतामध्ये उटी, आसाम परिसरात केली जाते. तर मुंबई, पुणे दिल्ली सारख्या शहरांमध्ये याची मोठी मागणी आहे.

मागणी बरोबर उत्पन्न अधिक

अँथेरियम हे फूल जिल्ह्यात खूपच हे कमी शेतकरी उत्पादित करतात. हे फूल महाग असते. त्यामुळे त्याला ठरावीक ठिकाणांहूनच मागणी असते. किरकोळ बाजारपेठेत हे फुल ५० ते ६० रुपयांपर्यंत विकले जाते. ठराविक लोकंच या फुलाची मागणी करत असून यास मुबलक असा दर मिळतो.

हे ही वाचा (Read This ) कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : आता वर्षभर पाण्याचे नो टेन्शन, आलंय नवीन आगळंवेगळं तंत्र

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *