खाते एक योजना अनेक, त्वरित करा अर्ज

Shares

सरकार नागरिकांच्या हितासाठी विविध योजना, कार्यक्रम राबवत असते. अशीच योजना सरकारकडून राबवण्यात आली आहे.

पंतप्रधान जन धन योजना (Jan Dhan Yojana) ही भारत सरकारने सुरू केलेल्या सर्वात महत्त्वाच्या योजनांपैकी एक आहे. हे देशातील करोडो लोकांना आर्थिक लाभ (DBT) प्रदान करते. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) योजना सुरू केल्यापासून आतापर्यंत ३८ कोटींहून अधिक जनधन खाती उघडण्यात आली आहेत.
अनेक खासगी बँका जन धन खाते उघडण्यास परवानगी देतात.

हे ही वाचा (Read This या आंतरपीकामुळे मिळेल भरघोस उत्पन्न

जनधन खात्याचे फायदे

  • PMJDY अंतर्गत पैसे काढण्याची मर्यादा १०,००० रुपये प्रति महिना आहे.
  • महिला खातेधारकांना त्यांच्या जनधन खात्यांमध्ये LPG सबसिडी आणि उज्ज्वला योजनेअंतर्गत रिफिल फीचा थेट लाभ मिळतो.
  • खातेदार या योजनेअंतर्गत खात्यात जास्तीत जास्त १,००,००० रुपये जमा करू शकतात.
  • जन धन खातेधारकांना २ लाखांपर्यंतचा अपघात विमा संरक्षण मिळते.
  • खातेधारकांना १०,००० रुपयांपर्यंतच्या ओव्हरड्राफ्ट सुविधेसह रुपे डेबिट कार्ड देखील मिळते.
  • बँका मोफत मोबाईल बँकिंग सुविधा देतात. खातेधारक त्यांच्या जन धन खात्यातील शिल्लक सहज तपासू शकतात.
  • PMJDY खातेधारक PM किसान आणि श्रम योगी मानधन योजना यांसारख्या थेट लाभाच्या योजनांसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
  • खातेधारकांना ३०,००० रुपयांचे जीवन विमा संरक्षण देखील मिळते.

हे ही वाचा (Read Thisबदक पालनातून शेतकऱ्यांना मिळणार अतिरिक्त उत्पन्न, कोंबड्यांपालना पेक्षा सोपे आहे

या खासगी बँकेमध्ये तुम्ही उघडू शकता जनधन खाते

  • अॅक्सिस बँक (Axis bank)
  • एचडीएफसी बँक (HDFC)
  • फेडरल बँक
  • येस बँक (Yes Bank)
  • आयसीआयसीआय बँक (ICICI)
  • कर्नाटक बँक
  • कोटक महिंद्रा बँक
  • इंडसइंड बँक
  • धनलक्ष्मी बँक
  • आयएनजी वैश्य बँक

हे ही वाचा (Read This ) एका एकरात लागवड करा मिळवा ६ लाख रुपये, बाराही महिने करता येते लागवड

जन धन खाते उघडण्यासाठी काय करावे?

तुम्हाला जनधन खाते उघडायचे असेल तर तुम्हाला PMJDY च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल. त्यानंतर अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह सबमिट करावे लागेल.

अधिकृत वेबसाइट

https://pmjdy.gov.in/

हे ही वाचा (Read This ) या फुलाची लागवड करून मिळवा अधिकाधिक उत्पन्न, एक फुल ५० रुपये

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *