आवक घटल्याने सोयाबीनला सोन्याचा भाव !

Shares

सोयाबीन तेलबियांच्या किमती मध्ये बाजारात वाढ झालेली दिसून येते आहे. आवक कमी आणि मागणी जास्त असल्यामुळे सोयाबीन तेलबियांच्या किंमतीमध्ये चांगली वाढ झालेली आहे. बाजारपेठेमध्ये सोयाबीनची आवक कमी आहे पण जे स्थानिक लोक आहेत त्यांची मागणी लक्षात घेऊन मोहरीच्या तेलबिया तसेच सिपीओ व पामोलीन च्या तेलबिया किमतीमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येत आहे.

इतर तेलबियांचे तेलाच्या किंमती सर्वसाधारण असल्याचे दिसत आहे तर काही तेलबियांच्या किमतीमध्ये घसरण झालेली आहे. शिकागो एक्सचेंज काही प्रमाणात खाली आहे असे व्यापारी वर्गाने सांगितले आहे. स्थानिक लोकांची मागणी वाढत चालली आहे पण बाजारामध्ये सोयाबीन आणि मोहरीची आवक खूपच कमी प्रमाणात आहे त्यामुळे सोयाबीन तेलबियांच्या किंमतीमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे आणि त्याचा परिणाम दुसऱ्या तेलबीयांवर झालेला दिसून येत आहे.

सोयाबीन झाले ८७०० रुपये प्रति क्विंटल :-

लातूर शहरात सोयाबीन बियाणे प्लांट डिलिव्हरीचा भाव ८४५० वरून डायरेक्ट ८६५० रुपये प्रति क्विंटलवर गेलेला आहे. यामध्ये जीएसटी कर सुद्धा आकारण्यात आलेला आहे. नांदेड जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी सोयबिनची लागवड करण्यासाठी प्रति क्विंटल ८७०० रुपये किमतीने सोयाबीन खरेदी केले आहे.

केंद्र सरकारने जर खाद्यतेलाची आयात किंमत कमी करण्याऐवजी तेल बियाण्यांचे उत्पन्न जर वाढविले तर आपल्याला परदेशी बाजारावर अवलंबून राहणे कमी होईल, अशी चर्चा चालू आहे.

ब्युरो रिपोर्ट – किसानराज डेस्क

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *