“ हि आहे जगातील सगळ्यात तिखट मिर्ची ” मोदींचं ट्विट झालं व्हायरल

Shares

नागालँडची ‘राजा मिर्ची’ ही खूप तिखट असते आणि म्हणूनच ही मिर्ची जगातील तिखट मिर्चीच्या यादीत पहिल्या पाचमध्ये सातत्याने असते.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल एक ट्वीट केलं आणि काही तासातच ते व्हायरल झालं. त्यांनी ‘अप्रतिम बातमी. ज्याने भूत जोलोकिया खाल्ली आहे त्यांनाच हे समजेल की ती किती मसालेदार आहे!” अशा कॅप्शनसह मंत्री पीयूष गोयल यांनी केलेलं ट्वीट शेअर केलं. पीयूष गोयल हे वाणिज्य व उद्योग मंत्री तसेच ग्राहक व्यवहार आणि अन्न व सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री आहेत. त्यांनी केलेलं हे ट्वीट नागालँडमधील सगळ्यात तिखट मिर्चीबद्दल आहे. या मिर्चीची निर्यात थेट लंडनला करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर केलेल्या ट्वीटला आतापर्यंत हजारो लोकांनी पसंती दर्शवली आहे.

नागालँडमधील ‘राजा मिर्चा’ लंडनमध्ये
ईशान्येकडील भागातील भौगोलिक संकेत उत्पादनांच्या निर्यातीला मोठा वाव मिळाला म्हणून, ‘राजा मिर्ची’ला नागालँडमधील ‘राजा मिर्चा’ म्हणून संबोधित केले गेले. ही मिर्ची २८ जुलैला पहिल्यांदाच गुवाहाटी हवाईमार्गे लंडनमध्ये निर्यात केली गेली.स्किव्हिल हीट युनिट (एसएचयू) वर आधारित किंग मिर्ची जगातील सर्वात लोकप्रिय मिर्ची मानली जाते. ही मिर्ची नागालँडच्या पेरेन जिल्हा टेनिंग येथून आणून गुवाहाटीच्या एपीएडीए सहाय्यक पॅकहाऊसमध्ये पॅक करण्यात आली.

नागालँडमधील मिर्चीला भूत जोलोकिया आणि भूत मिर्ची असेही म्हणतात. याला २००८ मध्ये जीआय प्रमाणपत्र मिळाले.एपेडाने (APEDA) नागालँड राज्य कृषी मार्केटिंग मंडळाच्या (NSAMB) सहकार्याने ताज्या राजा मिर्चीच्या पहिल्या निर्यातीसाठी समन्वय साधण्यात आला. जून आणि जुलै २०२१ मध्ये प्रयोगशाळेत चाचणीसाठी नमुने पाठविण्यामध्ये एपीएडीएने एनएसएएमबीशी समन्वय साधला होता आणि त्याचे निकाल सेंद्रीय पद्धतीने वाढल्यामुळे उत्साहवर्धक होते.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *