रब्बी हंगामातील गहू लागवड पद्धत

Shares

आपले प्रमुख अन्न म्हणून ओळखले जाणारे गहू हे रब्बी हंगामातील एक महत्वाचे पीक आहे.रब्बी हंगामात गहू बरोबरच ज्वारी , करडई , सूर्यफूल , हरभरा या पिकांची पेरणी केली जाते. गव्हाचे उत्पादन चांगले व्हावे यासाठी वेळेवर पेरणी , पेरणीची योग्य पद्धत , खताचे समतोल प्रमाण , पीक व पाणी व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊयात गव्हाच्या लागवड तंत्रज्ञानाबद्दल.

जमीन –
१. गहू पिकासाठी उत्तम निचरा करणारी भारी जमीन उपयुक्त ठरते.
२. हलक्या व मध्यम जमिनीत भरपूर खते व संतुलित रसायनांचा वापर केला तर आपण चांगले उत्पादन घेऊ शकतो.
३. गव्हाच्या उत्तम उत्पादनासाठी जमीन भुसभुशीत असणे गरजेचे आहे.
४. जमीन नांगरट करून हेक्टरी २५ ते ३० बैलगाड्या शेणखत मातीत मिसळावेत.
५. जमिनीची २ वेळा कुळवणी करावी.

पेरणी –
१. नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात गव्हाची पेरणी करावी. त्यांनतर पेरणी केल्यास उत्पादनात घट होते.
२. पेरणी करतांना जमिनीत ओलावा नसेल तर जमीन थोडी ओलवून घ्यावी.
३. प्रति हेक्टरी १०० ते १२५ किलो बियाणे वापरावेत.
४. पेरणी करतांना प्रति हेक्टर ६० किलो नत्र , १३० किलो युरिया , ६० किलो स्फुरद , ४० किलो पालाश द्यावे.
५. पेरणीसाठी गोदावरी , तपोवन , त्र्यंबक , एमएसीएस हे वाण वापरावेत.

बीजप्रकिया –
१. पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम या बुरशीनाशकाची ३ ग्राम प्रति किलो बियाणे अशी प्रकिया करावी.
२. पाच ते सहा सेमी उथळ म्हणजेच खोल पेरणी करावी.
३. जमिनीच्या उताराप्रमाणे गव्हासाठी २.५ ते ४ मीटर रुंद व ७ ते २५ मीटर लांब आकाराचे सारे पाडावेत.

पाणी व्यवस्थापन –
१. जमीन भारी असेल तर ६ पाण्याच्या पाळ्या १८ दिवसाच्या अंतराने द्याव्यात.
२. मध्यम जमिनीसाठी ७ पाण्याच्या पाळ्या १५ दिवसांच्या अंतराने द्याव्यात.
३. हलक्या जमिनीसाठी ८ ते १० पाळ्या १० ते १२ दिवसांच्या अंतराने द्याव्यात.
४. पाणी एकच पाळी देण्याइतके असेल तर पेरणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी गव्हास पाणी द्यावे.
५. दोन पाळी पाणी देण्याइतके उपलब्ध असेल तर २० ते २२ दिवसांनी गव्हास पाणी द्यावे.
६. तीन पाळी पाणी देण्याइतके उपलब्ध असेल तर पहिले २० ते २२ , दुसरे ४२ ते ४५ , तिसरे ६० ते ६५ दिवसांनी द्यावे.

कापणी –
१. गव्हाच्या काही जातींचे दाणे परिपक्व झाले की गळून पडतात. त्यामुळे पीक पक्व होण्याच्या २ ते ३ दिवसाआधी गव्हाची कापणी करावी.
२. कापणी करतांना दाण्यात १५ टक्के ओलावा असावा.
३. गव्हाची मळणी करतांना गव्हाचे दाणे फुटणार नाही याची दक्षता घ्यावी.

उत्पादन –
सुधारित वाणाचे उत्पादन प्रति हेक्टरी ४० ते ५० क्विंटल पर्यंत येते.

साठवण –
१. गहू उंदीर , पक्षी , ओलावा यांपासून मुक्त अश्या जागेवर साठवून ठेवावेत.
२. गहू धातूच्या पत्रात किंवा सिमेंटपासून बनवलेल्या सुधारित कोठीत साठवून ठेवावेत.
३. साठवणी पुरुनी गव्हाला २ ते ३ दिवस उन्हात ठेवावेत.

जगात भारताचा गहू उत्पादनात पहिला क्रमांक आहे. गहू आपले प्रमुख अन्न आहे. गव्हाची पेरणी ते साठवण पर्यंत थोडी काळजी घेतली तर गव्हाचे उत्तम उत्पादन होऊन आपल्या उत्पन्नात वाढ होते.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *