करवंदाचे फायदे व प्रक्रियायुक्त पदार्थ

Shares

करवंद फळाचे उगमस्थान भारत देश आहे.भारतात कोरडवाहू प्रदेशात सर्वत्र करवंदाच्या जाळ्या दिसून येतात. करवंदापासून बनवलेल्या पदार्थांना बाजारात मोठ्या संख्येने मागणी आहे. करवंदामध्ये मोठ्या प्रमाणात ड जीवनसत्व उपलब्ध असते. करवंद हे काटक व सदाहरित वृक्ष आहे. डोंगरी भागात , जंगलमध्ये हे झाड नैसर्गिकरित्या वाढते. २ ते ३ मीटर उंच हे झाड वाढते. करवंडचाही अनेक फायदे असून त्यापासून विविध पदार्थ बनवले जातात. करवंदापासून बनवलेल्या पदार्थांना स्थानिक तसेच दूरच्या बाजारपेठेत चांगली मागणी आहे.

करवंदाचे फायदे –
१. करवंदामध्ये क जीवनसत्व मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते.
२. पित्तावर हे फळ अत्यंत गुणकारी ठरते.
३. कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास हे फळ मदत करते.
४. करवंद रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करते.
५. करवंदाच्या सालीचा उपयोग विविध त्वचारोगावर केला जातो.
६. करवंदाच्या उपयोग चविंगम बनवण्यासाठी देखील होतो.

प्रक्रियायुक्त पदार्थ –
१. सरबत –
साहित्य – १ किलो करवंदे , ४०० ते ५०० ग्रॅम साखर , १२०० मिली पाणी

कृती –
१. करवंदाचे सरबत तयार करण्यासाठी पूर्ण वाढ झालेली करवंदे निवडावीत.
२. करवंदे २ ते ३ वेळा स्वछ पाण्याने धुवावीत
३. एक लिटर पाण्यात ही फळे टाकून शिजवून घ्यावीत.
४. थंड झाल्यावर मलमलच्या कपड्यातून हा लगदा गाळून घ्यावा.
५. तयार झालेल्या रसामध्ये ४०० ते ५०० ग्रॅम साखर , १२०० मिली पाणी टाकून ढवळून घ्यावे.
६. चवीसाठी थोडे मीठ व जिऱ्याची पावडर टाकावी.
७. जर हे सरबत जास्त काळ टिकून ठेवायचे असल्यास ७० अंश तापमानास १५ ते २० मिनिटे गरम करावे त्यांनतर हवाबंद बाटलीत भरून ठेवावेत.

२. चटणी –
साहित्य – १ किलो फळाचा रसमिश्रित गर , १ किलो साखर , ५० ग्रॅम मीठ , १५ ग्रॅम मिरची पावडर , ३० ग्रॅम वेलदोडे , ३० ग्रॅम दालचिनी ,६० ग्रॅम बारीक चिरलेला कांदा , १५ ग्रॅम बारीक चिरलेला लसूण ,१५ ग्रॅम बारीक चिरलेले आले, ८० ते ९० मिली व्हिनेगर.

कृती –
१. करवंदाच्या काढलेल्या गरात साखर व मीठ मिसळून हे मिश्रण उकळण्यास ठेवावेत.
२. एका कापडात कांदा , लसूण , आले बांधावे तर दुसऱ्या कापडात राहिलेले मसाले बांधावेत.
३. दोन्हीच्या पुरचुंड्या बनवून उकळत्या मिश्रणात सोडाव्यात.
४. थोड्याथोड्या वेळाने ह्या पुरचंडया पळीने दाबाव्यात.
५. मिश्रण घट्ट झाल्यावर पुरचुंडी चांगली पिळून काढावी.
६. मिश्रणात व्हिनेगर टाकून १ ते २ मिनिटे उकळून घ्यावीत.
७. हे मिश्रण बाटलीत भरण्यापूर्वी त्यात २५० पीपीएम सोडियम बेन्झोएट मिसळावेत.
८. हवाबंद बाटलीत हे मिश्रण भरून थंड करून घ्यावे.

३. लोणचे –
साहित्य – १.५ किलो करवंदे ,२५० ग्रॅम तापवून घेतलेले मीठ, २० ग्रॅम मेथी , ३० ग्रॅम हळद पूड , ५० ग्रॅम हिंग पूड ,४८ ग्रॅम लाल मिरची पावडर, १०० ग्रॅम मोहरी पावडर, ४०० ग्रॅम गरम करून थंड केलेले गोडेतेल.

कृती –
१. निरोगी फळे निवडून त्यांचे देठ काढून घ्यावेत.
२. स्वच्छ पाण्याने करवंदे धुवून निम्मे मीठ व हळद लावून २ ते ३ तास एका पातेल्यात ठेवावेत.
३. निम्म्या गोडेतेलात मेथी , हिंग , मोहरी , हळद यांची फोडणी द्यावी.
४. पाणी निचरून घेल्यावर ही फोडणी करवंदांवर टाकावी.
५. हे मिश्रण चांगले मिसळून त्यात २५० पीपीएम सोडियम बेंझॉइट टाकावे.
६. एका काचेच्या बाटलीत हे लोणचे भरून उरलेले तेल त्यात ओतावे. तेलाची पातळी लोणच्याच्या वर राहील याची काळजी घ्यावी.
७. हे लोणचे कोरड्या जागी साठवून ठेवले तर वर्षभर हे लोणचे चालते.

करवंदापासून चेरी , जॅम , सिरप इत्यादी प्रक्रियायुक्त पदार्थ बनवता येतात. या पदार्थांना बाजारात भरपूर मागणी आहे. तुम्ही करवंदाची शेती करून किंवा करवंदांवर प्रक्रिया करून पदार्थ बनवून चांगले उत्पन्न कमवू शकता.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *