पिकांमधील गंधकाचे महत्व

Shares

पीक व्यवस्थापन करताना मुख्यतः नत्र, स्फुरद व पालाश या अन्नद्रव्यांचा वापर करण्यात येतो. त्यामुळे उर्वरित अन्नद्रव्यांची कमतरता वाढत जाते. गंधक म्हणजेच सल्फर. बुरशीनाशक, कोळीनाशक म्हणून गंधकांचा वापर होतो. अलीकडे जमिनीत गंधकाची कमतरता जाणवू लागली आहे. पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी आणि जमिनीतील सामू नियंत्रित करण्यात गंधक महत्त्वाचे आहे.

  • गंधकाचे पिकांमधील कार्य –
  • १. गंधक हे प्रकाश संश्‍लेषण क्रियेत भाग घेऊन पानांमधील हरितद्रव्य वाढण्यास मदत करते. त्यामुळे पिकांच्या अन्ननिर्मितीला चांगली चालना मिळते.
  • २. गंधक हा प्रत्येक जिवंत पेशीचा एक भाग आहे. तसेच सिस्टीन, सिस्टाईन व मिथीनोओतीत या आवश्‍यक जमिनी आम्लांचा एक घटक आहे.
  • ३. गंधक हे बीजोत्पादनामध्ये वाढ होण्यास मदत करते. त्याचबरोबरीने द्विदल कडधान्य पिकांच्या मुळावरील गाठींमध्ये वाढ करण्यास व जिवाणूद्वारे नत्र स्थिरीकरण्यात मदत करते, विविध विकार व चयापचयाच्या क्रियेला मदत करते.
  • ४. भुरीच्या नियंत्रणासाठी गंधकाचा ८० टक्के वेटेबल पावडर म्हणून वापर होतो, कोळीनाशक म्हणूनही त्याचा वापर होतो.
  • ५. गंधकामुळे हरितद्रव्य निर्मितीत आणि प्रकाश संश्‍लेषणामध्ये वाढ होते.
  • ६. प्रथिनांचे प्रमाण वाढते. फळांमधील विद्राव्य पदार्थांचे प्रमाण वाढते.
  • ७. बुरशी व लाल कोळी नियंत्रणाचा व दुसरा उपयोग म्हणजे भूसुधार. अर्थात या साठी एलेमेंटल स्वरूपातील गंधक वापरावे लागते
  • गंधकाच्या कमतरतेमुळे पिकांमध्ये आढळून येणारी लक्षणे
  • १. पिकांची वाढ खुंटते, पीक कमजोर दिसते. नवीन येणारी पाने व पालवी पिवळी पडू लागतात.
  • २. द्विदल पिकांच्या मुळावरील नत्र स्थिरीकरणाच्या प्रमाण कमी होते.
  • ३. तृणधान्य वर्गीय पीक परिपक्व होण्यास उशीर लागतो. फळे पूर्णपणे पिकत नाहीत.
  • ४. पिकातील गंधकाची कमतरता सहज दिसून येते. पिकाची वाढ खुंटते, ते कमजोर दिसते (टेकू द्यावे लागतात), पाने पिवळी पडू लागतात, मुळांवर (द्विदलवर्गीय पिकात) गाठी कमी असतात, दाणे भरण्यास वेळ लागतो व फळे पूर्णपणे पिकत नाहीत.
  • सल्फरयुक्त खते –
  • १. पोटाशियम सल्फेट मध्ये गंधकाचे प्रमाण १७.५ टक्के, लगेच लागू होते, फवारणी तून दिले जावू शकते
  • २. झिंक सल्फेट मध्ये गंधकाचे प्रमाण १० टक्के, लगेच लागू होते. फवारणी तून दिले जावू शकते.
  • ३. मॅग्नेशियम सल्फेट मध्ये गंधकाचे प्रमाण १७ टक्के लगेच लागू होते. फवारणी तून दिले जावू शकते
  • ४. फेरस सल्फेट मध्ये गंधकाचे प्रमाण १०.५ टक्के लगेच लागू होते. फवारणी तून दिले जावू शकते
  • ५. अमोनिअम सल्फेट मध्ये गंधकाचे प्रमाण २३ टक्के लगेच लागू होते. फवारणी तून दिले जावू शकते.
  • ६. एक किलो गंधकाचा पुरवठा करण्यासाठी ४.३५ किलो अमोनिअम सल्फेट लागेल.
  • शुद्ध सल्फरयुक्त खते –
  • १. पिकात गंधकाची कमतरतेची लक्षणे दिसत असतील तर ती दूर व्हावी म्हणून पिकाच्या वाढीच्या गरजे नुसार विद्राव्य स्वरूपातील गंधक युक्त खते फवारावीत व ड्रीप ने किंवा आळवणीने डब्ल्यूडीजी स्वरूपातील खते ३ किलो प्रती एकर या दराने द्यावे.
  • २. हे पिक काढल्यावर पुढील पिकाची तयारी करते वेळी बेन्टोनाईट सल्फर एकरी २० ते २५ किलो द्यावे.
  • ३. बेन्टोनाईट सल्फरमध्ये गंधकाचे प्रमाण ९० टक्के असते. खूप हळू लागू होते. मातीतून द्यावे लागते. एकरी डोस २० ते २५ किलो चा असतो.
  • ४. डब्ल्यूडीजी सल्फरमध्ये गंधकाचे प्रमाण ८० किंवा ९० टक्के असते. वेगाने लागू होते.
  • ५. मातीतून द्यावे लागते. एकरी डोस ३ किलोचा असतो. याचा उपयोग फवारणीतून केल्यास बुरशीनाशक व लाल कोळी नाशकाचे काम करते. या व्यतिरिक्त वेटेबल स्वरूपातील इतर फोर्म्यूलेशन्स देखील असतात पण डब्ल्यूडीजी खते आल्यावर त्यांचे प्रमाण अत्यल्प झाले आहे.
Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *