पिकांमधील लोहाचे कार्य!

Shares

शरीरासाठी लोह फार महत्वाचे आहे . पिकांमध्ये देखील लोहाचे प्रमाण पद्धतशीर हवे . नाहीतर त्याचा परिणाम उत्पादनावर होतो. भारतीय जमिनीमध्ये एकूण लोहद्रव्याचे प्रमाण २०,००० ते १,००,००० मिलिग्रॅम प्रति किलो माती इतके आहे. मात्र, उपलब्ध लोहाचे प्रमाण अतिशय कमी आहे. उपलब्ध लोहाचे प्रमाण हे जमिनीच्या मूलभूत गुणधर्मांवर अवलंबून असते.

  • लोह कमतरतेची लक्षणे –
  • १. लोहाची कमतरता सर्वप्रथम कोवळ्या पानांवर दिसून येते.
  • २. पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो मात्र शिरा हिरव्या राहतात.
  • ३. अधिक कमतरता असल्यास पाने पांढरी आणि जर्जर होतातलोहाची कमतरता असताना नत्र देऊनही पानांना हिरवा रंग येत नाही, शिरादेखील पिवळ्या पडतात.
  • ४. संपूर्ण पाने फिकट पिवळी व पांढरी होऊन गळून पडतात.
  • ५. पीक नियमित फुलोऱ्यात येत नाही. फळांचा आकार लहान होतो.
  • ६. नवीन फांद्या वाकड्या होतात.लोहद्रव्याच्या कमतरतेमुळे पिष्टमय पदार्थाचे प्रमाण घटते.
  • लोहयुक्त खते आणि प्रमाण –
  • फेरस सल्फेट – २०%
  • फेरस अमोनियम सल्फेट – १४%
  • अमोनिया पॉली सल्फेट – २२%
  • आयर्न डीटीपीए चिलेट – १०%
  • आयर्न एचईडीटीए चिलेट – ५-१२%
  • लोहयुक्त खतांना चांगला प्रतिसाद देणारी पिके –
  • १. संत्रावर्गीय फळझाडे, द्राक्षे, फुलझाडे आणि अन्य फळझाडे.
  • २. लोहयुक्त खते चुनखडीयुक्त जमिनीत वापरल्यास पिकांना लागू होत नाहीत. अशा परिस्थितीत लोहयुक्त खते पिकांना फावारणीतून द्यावीत.
  • ३. जमिनीतून हेक्टरी 25 ते 50 किलो लोह सल्फेटच्या रूपाने देता येते.
  • ४. फळझाडे आणि पिकांना 0.5 ते 1 टक्के तीव्रतेच्या द्रावणाची फवारणी संवेदनशील अवस्था लक्षात घेऊन 2-3 वेळा करावी.
  • ५. ही फवारणी जमिनीतून दिलेल्या मात्रेपेक्षा सरस ठरते.
  • वनस्पतीतील कार्य –
  • १. पिकांच्या हिरव्या पानांचा लोह हा घटक नसला तरी अप्रत्यक्षरीत्या प्रकाश संश्लेषण क्रियेत उत्तेजकाचे कार्य करतो.
  • २. हरीत लवक निर्मितीत आणि हरीतलवकाच्या कार्यात लोह गरजेचे असते.
  • ३. पिकातंर्गत उर्जेच्या वहनासाठी लोह अन्नद्रव्य गरजेचे असते.
  • ४. लोह अनेक विकरांचा (एन्झायम्स) व प्रथिनांचा (प्रोटिन्स) घटक असून, इलेक्ट्रॉन स्थलांतर क्रियेत आणि इतर जीव-रासायानिक क्रियेत भाग घेतो.
  • ५. पिकातंर्गत अन्ननिर्मितीसाठी आणि चयापचयाच्या क्रियेत लोह गरजेचे आहे.नत्र स्थिरीकरण प्रक्रियेत लोह मदत करतो.

अशा प्रकारे पिकांच्या एकंदरीत वाढीवर लोह हा घटक अतिशय परिणामकारक ठरतो. त्यासाठी त्याची योग्य ती मात्रा पिकांना मिळणे आवश्यक असते.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *