पॉलिसेल्फेट शाश्वत शेतीसाठी अत्यंत उपयुक्त!

Shares

पॉलिसेल्फेट हे एक नैसर्गिक खनिज आहे. ज्यामध्ये चार प्रमुख पोषक घटक, पोटॅशियम, सल्फर, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आहेत.पॉलीसल्फेटला त्याच्या नैसर्गिक अवस्थेच्या उपयोगासाठी आयसीएल द्वारे उपलब्ध केलं जातं. पॉलीसल्फेट, उत्तरी समुद्राच्या खाली युकेच्या किनाऱ्यावर असलेल्या आयसीएल क्लीवलँडच्या खाणीतून १२५० मीटर खोलातून काढलं जात आहे आणि याला काडण करुन , छानणी करुन गोणीत भरलं जात आहे, आणि जगाच्या पाठीवर पोहचवलं जात आहे. पॉलीसल्फेटच्या उत्पादनात कोणतीच रासायनिक प्रक्रिया केली जात नाही. हे नैसर्गिक खत सेंद्रीय शेतीसाठी उपयुक्त आहे. पॉलीसल्फेटचे उत्पादन कार्बन उत्सर्जन (०.०३४ किलोग्रॅम प्रति किलो उत्पादन) खतांच्या विस्तृत श्रेणीच्या तुलनेत हे फारच कमी आहे.जे पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून फार महत्त्वाचे आहे.

  • पॉलीसल्फेटची उपयुक्तता –
  • १. पॉलीसल्फेट सर्व प्रकारच्या मातीत आणि पिकांसाठी एक उपयोगी नैसर्गिक खत आहे.
  • २. पॉलीसल्फेटपासून मिळणारे सल्फरमुळे पिकांमध्ये नायट्रोजनचा उपयोग वाढत जातो आणि नायट्रोजन उपयोगिताची कार्यदक्षता (एनयूई) मध्ये सुधार करते.
  • ३. पिकांमध्ये प्रथिने (प्रोटिन) निर्माण होण्यासाठी सल्फर (गंधक) आणि नायट्रोजनच्या पौष्टिकतेचे संतुलन राखणे खूप आवश्यक असतं.
  • ४. पॉलीसल्फेटमध्ये क्लोराईड (सीएल) कमी प्रमाणात असल्याने हे क्लोराईड तंबाखू, द्राक्षे, चहा इत्यादी पिके आणि बटाटे यासारख्या संवदेनशील कोरड्या पदार्यासाठी सर्वात योग्य खत आहे.
  • ५. शेतकऱ्यांसाठी हे कमी उत्पादन खर्चात अधिक सुविधाजनक आणि प्रभावी खत आहे.
  • ६. जे एकासह एकाच खतातून पिकांना चार वेगवेगळ्या आवश्यक पोषक घटक पुरवते.

पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून पॉलीसल्फेट हे महत्वाचे आहे . पॉलीसल्फेट भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात निवडलं जाणारं खत आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *