पौष्टिक मखानापासून बनणारे चविष्ट पदार्थ

Shares

मखाना हे पोषणतत्वाने भरपूर सर्वत्र उपलब्ध असणारे तलाव, तळे अशा दलदलीच्या क्षेत्रात उगवणारे एक जलीय उत्पादन आहे.हे आरोग्यासाठी लाभदायक आहे. यामध्ये प्रथिने, कार्बोदके, खनिजे आहेत.सर्व वयोगटासाठी फायदेशीर आहे.कमळाची पुष्पथाली आणि बिया याचा वापर खाण्यासाठी करण्यात येतो. कमळाच्या गड्ड्याचा वापर भाजून, तळून किंवा लोणच्यासाठी करता येतो. कमळाला गोल किंवा अंडाकार संत्र्या एवढे फळ येतात. या फळात १० ते २० कवचयुक्त काळ्या बिया असतात. या बियांना भाजून याचा उपयोग गोड पदार्थ, नमकीन, खीर, बर्फी, चिक्की, लाह्या, भाज्यामध्ये केला जातो.

मखानातील गुणतत्वे –

१. मखाना मध्ये प्रती १०० ग्रॅम कॅलरीज ३५०, कार्बोदके ६५, प्रथिने १८, फॅट १.९-२.१ तसेच २० मि.ग्रॅ. कॅल्शियम, ९० मि.ग्रॅ. फॉस्फरस आणि १.४ मि.ग्रॅ आयर्न, बी १ जीवनसत्वे, पोलीफेनोल, ए‌‍न्टी ऑक्सिडंट्स, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम असतात.
२. यामुळे हृदय, किडनी, डायबेटीजसाठी फायदेकारक आहे.
३. शरीरातील कोलेरेस्टॉल, रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी तसेच स्त्रियांसाठी मखना उपयुक्त आहे.
४. कमळाच्या गड्ड्यामध्ये रिबोफ्लाविन, निआसीन, सी आणि ई जीवनसत्वे असते.

मखानापासून बनणारे पदार्थ –

मखाना पावडर –
१. कढईमध्ये मखना बटर टाकून भाजून घ्यावा.
२. त्याला मिक्सर मध्ये टाकून बारीक वाटून घ्यावे. ३. हे पावडर भाज्या, सुप, लाडू, दुधामध्ये वापरता येते.
खीर –
१. खीर बनवण्यासाठी मखाना तूप टाकून भाजून घ्यावा.
२. गॅसवर दुधामध्ये साखर टाकून विरघळून घ्यावी. ३. त्यामध्ये ड्राय फ्रुट पावडर आणि मखाना टाकून ५-१० मिनिटे उकळून घ्यावी.

चिक्की –
१. चिक्कीसाठी मखाना भाजून घ्यावा.
२. त्याचे बारीक तुकडे करून घ्यावेत.
३. कढईमध्ये ५० ग्रॅम गूळाचा एकतरी पाक बनवून त्यात १०० ग्रॅम बारीक केलेला मखाना टाकून एकजीव करुन घ्यावे.
४. हे मिश्रण बटर लावलेल्या प्लेट मध्ये पसरवून घ्यावे आणि काप पाडावेत.
५. चिक्कीचे कप हवा बंद करून साठवून ठेवावी. ६. अशाप्रकारे पौष्टिक चिक्की बनविण्यासाठी यामध्ये शेंगदाणे, राजगिरा, जवस वापरता येते.

मखाना स्नॅक्स/लह्या –
१. लाह्या/मखाना तयार करण्यासाठी बिया मातीच्या किंवा बीडाच्या कढईमध्ये भाजल्या जातात.
२. दोन तीन दिवस सामान्य तापमानाला ठेऊन पुन्हा २५० ते ३३०°c पर्यंत भाजल्या जातात.
३. लाह्या किंवा स्नॅक्स हे वेगवेगळे मसाले वापरून अनेक प्रकारे बनवता येते.
४. यासाठी मखाना लाह्या कढईमध्ये तेल टाकून भाजून घ्याव्यात.
५. यामध्ये जीरा पावडर, काळे मीठ, आमचूर, मिरची पावडर टाकून भाजून चविष्ट स्नॅक्स बनवता येते.

बर्फी –
१. मखानाची बर्फी तयार करण्यासाठी मखना कढईमध्ये तेल किंवा तूप टाकून भाजून घ्यावे.
२. त्याची पावडर करून घ्यावी.
३. मखना पावडर ७० ग्रॅम, खोबरा खीस ३० ग्रॅम आणि ड्रायफ्रूट बटर टाकून भाजून घ्यावे.
४. नंतर यामध्ये ६० ग्रॅम साखर टाकून मिश्रण घट्ट होईपर्यंत हलवत राहावे.
५. मिश्रण घट्ट झाले कि ते तूप लावलेल्या ताटामध्ये पसरवून त्याच्या वड्या पाडाव्यात.

तर अश्या प्रकारे मखानाच्या शेतीतून आपण विविध प्रकारचे पदार्थ बनवून नवे उद्योग उभारू शकतो.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *