फळबाग लागवड आता अधिक सोईस्कर 5 गुंठे जमिन आहे अशा शेकऱ्यांनाही योजनेचा लाभ घेता येणार

Shares

शेतकऱ्यांना कल हा फळपीक तसेच हंगामी पिकांकडे जास्त वळतांना दिसत आहे. तर फळबागांचे क्षेत्र वाढावे यासाठी कृषी विभागाकडून देखील प्रयत्न सुरू आहेत. मागील ४ वर्षापासून नैसर्गिक आपत्ती मुळे फळबागांचे नुकसान होतांना दिसत आहे. मात्र यंदा १० हजार हेक्टर ने फळबागांचे क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने दिला आहे. याचे कारण म्हणजे फलबागचे महत्व तसेच सरकार कडून राबविल्या जाणाऱ्या योजना हे होय. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये काही बदल करण्यात आले आहे. आता पर्यंत या योजनेचा लाभ अधिक शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांनी घेतला होता. आता मात्र ५ गुंठे शेतजमीन असली तरी लाभ घेता येणार आहे. इतकेच काय तर अनुदान रकमेत वाढ देखील करण्यात आली आहे.

वाचा (Read This) काळ्या मक्याची शेती, कोणत्याही हंगामात लागवड करून मिळवा अधिक नफा

अनुदान मध्ये झालेला बदल

पूर्वी २ हेक्ट्रसाठी २ लाख २५ हजार पर्यंत अनुदान देण्यात येत होते. तर आता यामध्ये बदल करण्यात आला असून आता २ हेक्टर साठी ८ लाख रुपये पर्यंत अनुदान देण्यात येत आहे. डाळिंब, संत्री, आंबा, पेरू, द्राक्ष या फळांचा यामध्ये समावेश होतो. आता पर्यंत १ लाख २२ हजार ४२१ हेक्टरवर फळबाग लागवड करण्यात आली आहे. मागील वर्षी नव्याने ४५ हजार हेक्टर वर फळबाग लागवड करण्यात आली होती. तर यंदा ५५ हजार हेक्टर ने वाढेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हे ही वाचा (Read This) BLACK SOIL: कोणत्या पिकासाठी काळी माती आहे सर्वोत्तम, जाणून घ्या काळ्या मातीची वैशिष्ट्ये

योजनेतील अनुदानाचे स्वरूप कसे आहे?

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड करणारे बहुतांश जण हे जॉब कार्ड धारक असतात. त्यामुळे त्यांनी केलेल्या फळबाग लागवडीचे संगोपन करण्याची जबाबदारी त्यांचीच असते. वृक्षनिहाय मापदंड यानुसार दुसऱ्या तसेच तिसऱ्या वर्षातील जिवंत झाडाच्या टक्केवारी करण्याची जबाबदारी लाभार्थ्यांची राहील. दुसऱ्या तसेच तिसऱ्या पिकांच्या वेळी ७५% झाडे जिवंत ठेवतील अशाच लाभार्थींना अनुदान दिले जाईल. मजूर दरामध्ये आता सुधारणा करून २०१ रुपये प्रति मजूर असा करण्यात आला आहे.

हे ही वाचा (Read This) रिक्रूटमेंट 2022: टपाल विभाग रिक्त जागा भरणार, शिक्षण ८ वी पास , या तारखेपूर्वी करा अर्ज

शेतकऱ्यांनी दिला आंबा लागवडीवर जास्त भर

फळबाग पिकांमध्ये शेतकऱ्यांनी आंबा लागवडीला जास्त पसंती दिली आहे. २० हजार ५६८ हेक्टर क्षेत्रावर आंबा लागवड झाली आहे. तर आता संत्र्याच्या क्षेत्रामध्ये देखील वाढ होतांना दिसत आहे. त्यामुळे लवकरच फळबागेचा क्षेत्रात वाढ होईल असा अंदाज दर्शवला जात आहे.

हेही वाचा : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा DA १३% वाढणार, तीन महिन्यांची थकबाकीसुद्ध

Shares