रिक्रूटमेंट 2022: टपाल विभाग रिक्त जागा भरणार, शिक्षण ८ वी पास , या तारखेपूर्वी करा अर्ज

Shares

India Post Recruitment 2022 : भारतीय टपाल विभागाने कुशल कारागीर पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. यासाठी उमेदवाराचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे

तुम्हाला सरकारी नोकरी करायची असेल, तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आली आहे. भारतीय टपाल विभागाने कुशल कारागिरांच्या पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. विभागाने त्यांच्या अधिकृत वेबसाइट indiapost.gov.in वर अधिसूचना जारी केली आहे. तुम्हाला इंडिया पोस्ट स्किल्ड आर्टिसन्स भरती 2022 साठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही 9 मे 2022 रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकता.

हे ही वाचा (Read This)  मराठवाड्यात हळदीला मिळतोय विक्रमी दर, पावसाच्या भीतीने शेतकऱ्यांचा पीक काढणीसाठी जोर

जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या प्रक्रियेद्वारे, इंडिया पोस्टमध्ये एकूण 9 पदांची भरती केली जाईल. यामध्ये मेकॅनिक (मोटर व्हेईकल) 5 पदे, इलेक्ट्रिकल 2 पदे, टायरमन 1 पद आणि लोहार 1 पदाचा समावेश आहे. या पदांवर निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांना मॅट्रिक्स लेव्हल 2 अंतर्गत 19900 रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल.

हे ही वाचा (Read This)  आता नोकरी १२ तासांची, पगार पण कमी, पीएफ वाढणार- १ जुलैपासून मोदी सरकार लागू करणार नवे नियम ?

वय मर्यादा

अधिसूचनेनुसार, या पदांच्या भरतीसाठी उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे. त्याचबरोबर सरकारी नियमांनुसार, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत विशेष सवलत दिली जाईल.

हे ही वाचा (Read This) केळीच्या फांद्यापासून सेंद्रिय खत बनवून नफा कमवू शकतात शेतकरी

शिक्षण

या पदांसाठी, उमेदवार 8 वी उत्तीर्ण असावा किंवा मान्यताप्राप्त तांत्रिक संस्थेतून संबंधित ट्रेडचे प्रमाणपत्र असावे. अधिक तपशीलांसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना वाचू शकतात.

हे ही वाचा (Read This) ब्राह्मी या औषधी पिकाची लागवड करून मिळवा अधिकचा नफा

निवड कशी होईल

या पदांसाठी भरतीसाठी उमेदवारांची निवड ट्रेड टेस्टनुसार होईल.

हेही वाचा :बँकेच्या वेळा बदलल्या, RBI चा मोठा निर्णय

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *