मोड आलेले कडधान्य खाण्याचे फायदे

Shares

तुम्ही ऐकले असाल किंवा डॉक्टरांनी सागितले असेल की मोड आलेले कडधान्य शरीरासाठी उत्तम असतात.मोड आलेले धान्य पौष्टीक आणि चविष्ट असतातच आणि त्याच बरोबर त्या मध्ये प्रथिने असतात . मोड आलेली धान्ये हा सर्वोकृष्ट आहार आहे अस म्हणत येईल .कडधान्ये मोड आणून खाण्याची पध्दत खरंच आरोग्यदायी आणि फायदेशीर आहे. मोड न काढलेल्या कडधान्यामध्ये टॅनीन, फायटीक अॅसीड आणि ट्रिप्सीन इनहीबीटर ही  तीन अशोषक द्रव्ये असतात.
महाराष्ट्रमध्ये कडधान्यांना मोड आणून खाण्याची जुनी आणि चांगली परंपरा आहे. त्यामुळे काही विशिष्ट विकरे उत्तेजीत होतात आणि त्यांच्यामुळे चांगले बदल घडवून येतात. डायट फॉलो करायचा असेल तर मोड आलेले कडधान्य खाल्लेले अगद  चांगले असतात. तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर आहारात मोड आलेले कडधान्यांचा समावेश करा. मोड आलेल्या कडधान्यांमध्ये मोठया प्रमाणावर फायबर असतात. त्यामुळे पोट भरते आणि लवकर भूकही लागत नाही.
तुमच्या सकाळच्या नाष्ट्यामध्ये मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश करा.ज्यामुळे तुम्ही दिवसभर उत्साही राहाल आणि तुमच्या शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते.
मधूमेह असणाऱ्या लोकांनी मोड आलेल्या मेथी दाण्यांचा आहारात वापर करावा. तसेच मोड आलेल्या कडधांने शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत करतात.मोड आलेल्या कडधान्यांमधील  व्हिटॅमिन आणि मिनरल्स तुमच्या केस आणि त्वचेसाठी फायदेशीर असतात.

कसे बनतात मोड आलेले कडधान्ये :–
१. धान्य किंवा कडधान्याला मोड येण्यासाठी पाण्यात भिजत घालावे.
२. जवळपास 6 ते 7 तास ते कडधान्यं घालावे. त्यानंतर ते भिजलेले कडधान्यं फुगते.
३. नंतर भिजवलेलं धान्य हे एका स्वच्छ कापडामध्ये रात्रभर बांधून ठेवावे.
४. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या धान्याला मोड फुटतात.

सकाळी नाश्‍ता करताना यांचा समावेश तुमच्या आहारात केला तर खूप फायदा होतो .याने तुम्हाला दिवसभर वारंवार भूक लागत नाही आणि जीवनसत्वे ही मिळतात . तुम्ही दिवस भर उत्साही राहता . 

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *