बाजार समिती संचालकाची गोळ्या घालून हत्या

Shares

यवतमाळ तालुक्यातील भांबराज येथील बाजार समिती संचालक तसेच माजी सरपंच सुनील डिवरे यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. ही खळबळ उडवणारी घटना गुरुवारी ३ जानेवारी रोजी रात्री ८ च्या सुमारास घडली. या घटनेनंतर अनेक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात गर्दी केली होती. डिवरे हे शिवसेनेचे कार्यकर्ते तसेच ग्रामपंचायत सदस्य देखील होते तर त्यांची पत्नी अनुप्रिया डिवरे ह्या विद्यमान सरपंच आहेत. घटना घडलेल्या दिवशी डिवरे हे सायंकाळी घरी आल्यानंतर त्यांच्या घराच्या आवारामध्ये ३ मारेकऱ्यांनी त्यांना गाठून त्यांना गोळ्या घालून कुऱ्हाडीने वार करत त्यांची हत्या करण्यात आली. हल्ल्यानंतर त्यांना लगीच यवतमाळ येथील कै. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये नेण्यात आले होते. परंतु घटनस्थळीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

हे ही वाचा (Read This ) शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक, असे काढा शेतकरी प्रमाणपत्र

डिवरे यांच्यावर हल्ला झाल्याची बातमी कळताच शिवसेना कार्यकर्त्यांनी कै. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये मोठ्या संख्येने गर्दी केली होती. वाढत जमाव पाहून रुग्णालयाचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. या घटनेची तपासणी पोलीस करत आहेत.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *