खूप दिवसानंतर कांदा दरात हलकी वाढ, जाणून घ्या आजचे दर

Shares

आधीच अवकाळीमुळे उत्पादनात मोठी घट झाली असून पिकांच्या लागवड आणि व्यवस्थापनासाठी अधिकचा खर्च लागला आहे. त्या खर्चाच्या तुलनेत अगदी कवडीमोलाचा दर मिळत आहे.

कांदयाचे आजचे दर

nion rate

दक्षिण राज्याच्या कांद्याचा महाराष्ट्र कांद्यावर परिणाम

दक्षिणेकडील तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यांमधून कांदा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात येत आहे. भारतभर महाराष्ट्रातील कांद्याची प्रत सर्वोत्तम समजली जाते.
भारतात महाराष्ट्रात जास्त प्रमाणात कांदा लागवड होते त्याचबरोबर मध्यप्रदेश, गुजरात,कर्नाटक, राजस्थान येथे देखील कांदा लागवड भरपूर प्रमाणात केली जाते.

दक्षिण भागात तामिळनाडू, आंध्रप्रदेश , कर्नाटक येथे जास्त प्रमाणात कांदा लागवड झाली आहे. तेथील बाजारपेठेत जास्त संख्येने कांदा विक्रीस आला आहे. दररोज बाजारात कांदा विक्रीनंतर देखील अधिक संख्येने कांदा बाकी राहतो. त्यामुळे कांदयाच्या दरात घसरण होत आहे.

हे ही वाचा (Read This ) कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : आता वर्षभर पाण्याचे नो टेन्शन, आलंय नवीन आगळंवेगळं तंत्र

कांदयाच्या दरात स्थिरता

मागील दीड – दोन महिन्यांपासून लाल कांद्यास कमीतकमी १२०० ते १५०० तर जास्तीत जास्त ३००० ते ३२०० प्रति क्विंटल असा दर मिळत होता.
त्यानंतर हा दर स्थिर असल्यामुळे अर्थकारण थोडं बसत होतं . मात्र आता दरामध्ये ५०० ते ६०० रुपयांनी घट झाली होती. त्यामुळे आता सर्वच अर्थकारण बिघडले आहे. तर आता कांद्याच्या दरामध्ये मागील ३ दिवसापासून स्थिरता आहे.

लाल कांदा साठवणूक का केली जात नाही ?

उन्हाळी कांद्यांची काढणी केल्यानंतर त्यांची साठवणूक करता येते मात्र लाल कांद्याच्या बाबतीत असे नाही करता येत.

लाल कांद्याची साठवणूक करता येत नाही त्यामुळे काढणी केलेला संपूर्ण कांदा बाजारात विक्रीस न्यावा लागतो. नवीन कांद्याची काढणी आता सुरु झाली आहे . त्यामुळे कांदा उत्पादनात वाढ होईल. याचा मोठा फटका कांदा उत्पादकास बसणार आहे.

सोयाबीन , कापूस स्थिती

कापसाबरोबर इतर पिकांचेही खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र इतर शेतमालाच्या तुलनेत कापसाला सुरुवातीपासूनच चांगला दर होता . एवढेच काय तर मागील ५० वर्षातील विक्रमी दर कापसाला मिळाला आहे.

तर उन्हाळी सोयाबीनचा पेरा मोठ्या संख्येने झाल्यामुळे खरिपातील बियाण्यांची चिंता मिटली असून शेतकऱ्यांची धावपळ कमी होणार आहे. इतकेच काय तर बियाण्यांची खरेदी करतांना होत असलेली फसवणूक टळणार आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *